Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

लंम्पी आजारावर प्रभावीपणे लसीकरण व उपाययोजना तात्काळ सुरू करा.पशुसंवर्धन विभागाकडे माजी नगरसेवक सुरज देसले यांची मागणी..!


शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी-धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा शहरात व ग्रामीण भागातील बरेचसे शेतकऱ्यांकडे पशुधन आहेत. राज्यात जनावरांना भेडसावणाऱ्या लंम्पीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यासाठी लसीकरण व  उपाययोजना तात्काळ सुरू करण्यात याव्यात.राज्य अनेक जिल्हासह धुळे जिल्ह्यातही पशुधनावर लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे उघडकीस आले आहे. 

या आजाराविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी व लसीकरण करण्यात यावे.तसेच शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग प्रत्येक गावात जाऊन लसीकरण करण्यात यावे. लंम्पी आजाराचा प्रादुर्भावाने जनावराचे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई देण्यात यावी.लंम्पी रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक लस,औषधे , साधन सामुग्री तात्काळ उपलब्ध करण्यात यावी.पशुधन आपली संपत्ती आहे त्याचे जपणूक करणे आवश्यक आहे.लंम्पीने पशूंना ग्रासले आहे. 

याववर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पावले तातडीने उचलावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरज देसले यांनी शिंदखेडा येथील सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभाग यांना पत्र देऊन मागणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध