Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून घेण्यास दिरंगाई; नक्की दबाव कोणाचा? शिरपूर शहरातील सर्वसामान्य जनतेचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर...!

  
                                                 

शिरपूर : शिरपूर शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तींच्या मुलास शहरातील काही गाव गुंडांनी ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ ते ५.३० वाजेच्या दरम्यान लोखंडी सळई,काठी व दगडाने मारहाण करून जबर जखमी केले. याबाबत शिरपूर पोलीस स्टेशन तब्बल अकरा ते बारा दिवस होऊन देखील गुन्हा दाखल करण्यास हेतूपुरस्सरपणे दुर्लक्ष व दिरंगाई करत असल्याचे दिसून येत आहे. 

याबाबत सविस्तर उत्तर पुढील प्रमाणे शिरपूर शहरातील खंडेराव महाराज ट्रस्टचे ट्रस्टी श्रीहरी लिंगाय्या यादगिरीवार यांचा लहान मुलगा विद्यासागर यास गावातील नामांकित गावगुंडांनी घराच्या परिसरात येऊन अत्यंत पूर्वनियोजित पणे कट कारस्थानाने लोखंडी सळई, काठी व दगडाने मारहाण करून जबर जखमी केले. याबाबत शासकीय रुग्णालयाचे आवश्यक ते सर्व वैद्यकीय दाखले पोलीस स्टेशनला प्राप्त होवून देखील गुन्हा दाखल करून घेण्यास हेतूपुरस्सर दिरंगाई करण्यात येत आहे. 

मग नेमके हा गुन्हा दाखल होवू नये म्हणून दबाव कुणाचा? व जर अशा दबावाला पोलीस प्रशासन बळी पडणार असेल तर शिरपूर शहर वासियांची सुरक्षितता नेमकी कोणी करायची व ती कशी व कोणाच्या दबावाने व सांगण्यावरून हा शिरपूर शहर वासियांसमोर उभा राहिलेला यक्ष प्रश्न आहे.

महाराष्ट्रातील अत्यंत शांत म्हणून व सुवर्ण नगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या शिरपूर शहरातील अत्यंत सुशिक्षित समजला जाणारा परिसर म्हणजे काशीराम नगर यालाच वकील कॉलनी असे म्हणतात. या ठिकाणी सर्वच कायद्याचे रक्षण करणारे कायदे तज्ञ मंडळी राहते.या परिसरात राहणारे श्रीहरी अण्णा यांच्या मुलास त्यांच्याच वस्तीत व त्यांच्याच घराजवळ जाऊन पाच ते सात गावगुंडांनी फिल्म टाईल पद्धतीने विद्यासागर याच्यावर लोखंडी सळई, काठी व दगड याच्याने मारहाण करण्यास सुरुवात केली व असे करताना येथून निघून जा अन्यथा तुम्हाला मारून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी देखील त्यांनी दिली. 

अशा पद्धतीने दिवसाढवळ्या भर वस्तीत कोणालाही मारहाण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असा प्रकार घडून अकरा ते बारा दिवस होऊनही कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेण्यास पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ करणे म्हणजेच हेतूपुरस्सर दिरंगाई करणे याचा अर्थ गुन्हा दाखल होऊ नये म्हणून कोणत्यातरी बड्या हस्तीचा पोलीस प्रशासनावर नक्कीच दबाव निर्माण झालेला आहे असे प्रथमदर्शनी दिसून येते. जर अशा दबावांना पोलीस प्रशासन बळी पडत असेल तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेची हमी नक्की कोणाची? व कशी? असा प्रश्न परिसरातील नागरिकनी केलेला आहे. 

तरी पोलीस प्रशासनाने या प्रश्नाचे तात्काळ कारवाई करून उत्तर द्यावे असेच नागरिकांचे म्हणणे आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध