Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात परिवहन विभागाचे अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने अनाधिकृत टू व्हीलर चे शोरूमांचा सुळसुळाट... !



तरुण गर्जना वृत्तसेवा शिरपूर प्रतिनिधी शिरपूर: खरे पाहता,अधिकृतपणे परवानाधारक असलेल्या टू व्हीलर विक्रेत्यांच्या शोरूम मध्येच टू व्हीलर वाहने ठेवण्याचा अधिकार आहे.असे असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे सब -डीलरच्या नावाखाली मोठमोठे शोरूम सुरू करण्यात आले असून त्यात वाहने ठेवून त्यांची खरेदी विक्री केली जाते. जिल्ह्यातील सोनगीर शिरपूर,दोंडाईचा साक्री,नेर,होळनांथे,नरडाना या ठिकाणी मोठमोठे शोरूम आहेत.हे शोरूम रस्त्याच्या कडेला लागून असताना देखील परिवहन विभागाचे कोणताही अधिकारी यांच्याकडे लक्ष देत नाही . 

खरे पाहिले तर धुळ्याहून हाडाखेड चेक पोस्ट कडे जाण्यासाठी रोजच आरटीओ ची गाडी धुळे- शिरपूर ये - जा करते.तसेच रोख रक्कम भरणा करण्यासाठी देखील ये - जा करते.मग यांना मुख्य रस्त्याला लागून असलेले अनधिकृत शोरूम या अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का? कि बघुन हे काना डोळा करतात ? म्हणजेच यांच्यावर परिवहन विभागाचा नक्कीच वरदहस्त आहे. 

असे म्हणणं चुकीचे ठरणार नाही.जिल्ह्यातील बहुतांश शहरात देखील अशी शोरूम आहेत.या शहरी भागात रोजच दिवसातून दोन वेळा पोलीस गाडी गस्त घालीत असते.मग पोलीस प्रशासन नक्की यांच्याकडे लक्ष का देत नाही ?या शोरूम मधून विक्री होणाऱ्या गाड्यांवर घेतले जाणारे इतर चार्जेस व जीएसटी कर हे नक्की किती व प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयाची आकारणीची फि रक्कम किती ? याचा उलगडा आज पावेतो मात्र ग्राहकांना झालेलाच नाही. यात मोठ्या प्रमाणात ग्राहकांची लुबाडणूक केली जाते.तसेच गाडी फायनान्स करायचे असल्यास फायनान्सची दर वेगळेच असतात यांचे फाईल फी मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून वसूल केली जाते. मात्र प्रत्यक्षात ती कमी असते.

धुळे जिल्ह्याबरोबरच नंदुरबार
जिल्ह्यात देखील हिच प्रथा कायम आहे.खरे तर बघितले तर नंदुरबार जिल्ह्यात आमच्या प्रतिनिधीने घेतलेला माहितीतून फक्त आणि फक्त दोनच शोरूम अधिकृत आहेत.असे असताना जिल्ह्यात जवळपास पंधरा ते वीस शोरूम सुरू आहेत मग हे शोरूम अधिकृत नसताना कोणाच्या वरदहस्ताने सुरू आहेत? परिवहन विभागाचे आरटीओ करतात काय ? केवळ आपला खिसा भरला म्हणून बाकी सर्व विसरा...असा तर हा प्रकार नाही ना ? आणि म्हणूनच याबाबत आता शंकाच निर्माण होत आहे याची सविस्तर माहिती बाहेर काढणे गरजेचे
आहे.

मग यांच्यावर वरदहस्त नेमका कुणाचा हे नक्की समोरील येईल व त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत . अधिकृत शोरूम मध्ये आलेली वाहने यांवर खरोखर जीएसटी आकारणी होते का व किती ? त्याचा भरणा नियमीत होतो का ? याबाबत देखील जीएसटी विभागाला विचारणा आम्ही करणार आहोत.आता तरी परिवहन विभाग व पोलीस प्रशासन यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अनाधिकृत शोरूम यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करेल का ? याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.

(वाचा सविस्तर पुढील अंकात) 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध