Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

शिंदखेडा येथील वकील संघाच्या वतीने शहादा न्यायालयाचे सहा. सरकारी वकील अँड.बागुल यांना पोलिसांकडून मारहाण प्रकरणी कारवाई ची मागणी - कामबंद निषेध..!



शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी शहादा येथील सहा.सरकारी वकील अँड गणेश महारु बागुल यांना शहादा पोलिसांनी जबर मारहाण करून हात फॅक्चर केल्याप्रकरणी पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावे यासाठी शिंदखेडा वकील संघाच्या वतीने आज न्यायालयात आजचे कामबंद करून निषेध व्यक्त करण्यात आला. सदर निवेदन तहसीलदार यांना आज सुट्टी असल्याने उद्या वकील संघाचे शिष्टमंडळ देणार आहे.

तहसीलदार मार्फत राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते,पालकमंत्री,
पोलीस महासंचालक,पोलीस महानिरीक्षक,पोलीस अधीक्षक,पोलीस निरीक्षक यांच्या सह संबंधित वरीष्ठांना पाठवले आहे.सदर निवेदनाद्वारे म्हटले आहे की,शहादा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात सहा.सरकारी अभियोक्ता अँड.गणेश महारु बागुल हे सन-२०१८ पासून कार्यरत आहेत.सदर मारहाण करणारे पोलिस कर्मचारी हे शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत असुन ते कोर्टात कामानिमित्ताने येत असतात ते अँड. बागुल हे आदिवासी समाजाचे यांना माहिती व जाणीव होती.तरीही अँड. बागुल हे न्यायालयीन कामकाज आवरुन फळं व भाजीपाला घेण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ व बसस्थानक लगत डोंगरगाव रोडवर त्यांची चारचाकी वाहन क्रं.एम.एच.
बी.आर.-5612 अशी रस्त्यालगत कोणासही अडचण होणार नाही उभी केली होती.त्यादरम्यान अँड.बागुल हे साइडला उभे असताना त्यांच्या भ्रमणध्वनी वर ७.४१ वाजेचा म.ग्र.पो.ई. चलन क्रं NDBCM -22008151467 अन्वये दंड आल्याचे समजले ते वाचत असताना पोलिस कर्मचारी कपिल देसले हे जवळ येऊन म्हणाले की,अक्कल नाही का रे तुला,गाडी कुठेही लावतो का? गाडीला वकिलांचा लेबल लावला म्हणजे तु  जहागीरदार झाला का,साला भिलट्या चल साहेबांकडे तुला पोलिसी खाक्या दाखवितो असे म्हटल्यावर अँड. बागुल यांनी पोलिस कर्मचारीना समजून सांगितले की माझी गाडी वाहतुकीला अडथळा करत नाही तरी आत्ताच मला चलन आलेले आहे.

म्हणून मी साहेबांकडे येवू शकत नाही असे सांगून जात असताना मागुन पोलीस कर्मचारी यांनी मारहाण सुरू केली व आणखी तीन पोलिसांनी जबर छाती, तोंडाला, मानेवर हाताबुक्याने मारहाण केली म्हणून पोलिस कर्मचारी दिनकर चव्हाण, कपिल देसले व इतर यांनी तु भिलटया आहे म्हणत अर्वाच शब्दात भडवा,भ्यानचोद,
मादरचोद,लंगठया वकील आहे.असे म्हणत आदिवासी समाजाचा अपमान केलाआहे. 

तेवढ्यावर ते थांबले नाहीत तर पिंजरा गाडीत उचलून टाकत असताना त्यांच्या हाताला लोखंडी रॉड प्रसंगावधान राखून हाताला लागत हात फॅक्चर झाला डोक्याला लागला असता तर जागेवर मृत्युमुखी पडले असते.गाडीत घेऊन जाताना ही मारहाण केली ह्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सरकारी वकील अँड.विपुल कदम यांनी धाव घेत असताना त्यांना ही मारहाण केली.दोन्ही ही शहादा अॅक्सिडेंट हास्पिटल ला भरती झाले ते उपचार सुरू असताना उलट तुमच्या वर भादवि ३५३ कलम लावून गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली होती. हा सर्व घटनाक्रम अँड. विपुल कदम यांनी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता फिर्याद देखील घेतली नाही म्हणून आम्ही शिंदखेडा वकील संघाच्या वतीने आज न्यायालयात हजर होऊन ह्या प्रकारच्या विरोधात अशा माणुसकीला अयोग्य मार्गी व जातिवाचक शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करित असुन आज एक दिवस न्यायालयाचे कामकाज बंद करून कामबंद निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

ह्यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अँड.व्ही.ए.पवार,उपाध्यक्ष अँड.बी.झेड.मराठे सचिव अँड. व्ही.एस.पाटील सदस्य व्ही.एम.भामरे ,बी.व्ही.सोनवणे , एन.बी.मराठे ,एस.एन.जाधव, अँड.गुजराथी,ए.सी.मंगासे,
ए.एन.शेख, हर्षल अहिरराव, रितेश महिरे,निलेश पवार, व्ही.एस.पाटील, समाधान मराठे, मिलिंद सोनवणे,आर.
एफ.पाटील,पी.सी.जाधव, के.व्ही.भामरे,पुजा कासार, चंद्रकांत बैसाणे,चेतन कोळपकर,भुषण मराठे,
शहाबान शेख,वाय.आर.परमार, प्रमोद परदेशी यांच्या सह वकील संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य सहभागी होऊन कडकडीत कामबंद निषेध व्यक्त करित संबंधित पोलिस कर्मचारी वर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यानिमित्ताने देण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध