Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

जिल्ह्यातील सर्वत्र शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने निवेदन..!




महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक २०/९/२००८  रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात यावा असा निर्णय घेऊ तसे परिपत्रक २०/९/२००८ रोजी प्रकाशित केले आहे. तसे परिपत्रक निघून तब्बल १४ वर्षे पूर्ण देखील हा दिवस साजरा करण्यास शासकीय अधिकारी वर्ग अवगत नसल्याचे दिसून येत असल्याने, धुळे जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांना माननीय तहसीलदार शिरपूर यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.  

तसेच संघटनेतील कार्यकर्त्यांना प्रथम अपिलाच्यावेळी जाणवलेल्या उनिवा व येणाऱ्या अडचणी देखील या निवेदनात दिलेल्या आहेत.यात प्रथम अपिलीय अधिकाऱ्याला अर्जदाराच्या वतीने प्रतिनिधी हजर राहू शकतो याचीच माहिती नसणे, व तशी नोंद स्पष्ट सुनावणी नोटीस करणेबाबत माहीत नसणे, प्रथम अपीलाच्या सुनावणी पत्रावर कार्यालयाचा फोन नंबर व ईमेल आयडी नसणे, माहिती शुल्क कसे घेतले जाते?  त्याच्यासाठीचा कालावधी मर्यादा काय? माहिती कशाप्रकारे प्रमाणित करावी?  कार्यालयाचे जन माहिती अधिकारी व प्रथम अपील अधिकारी यांच्या नेमप्लेट लावलेल्या नसणे, अशा कितीतरी बाबींची माहिती जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांना माहित नसल्याचे दिसून आले. 
त्याबाबत देखील निवेदनात नोंद करण्यात आली आहे. 

तसेच ग्रामपंचायत स्तरावर जन माहिती अधिकारी हे जवळपास ९० टक्के माहिती अधिकाराच्या अर्जांवर सविस्तर माहिती असल्याने अवलोकनास यावे.असेच पत्र काढतात मात्र प्रत्यक्ष अवलोकनाचे पत्र देताना असलेली माहिती अंदाजे किती सविस्तर आहे याबाबत पानांचा उल्लेख पत्रात केला जात नाही त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील जन माहिती अधिकार प्रथम अपील अधिकारी यांनी माहिती अधिकार अधिनियमांचे प्रशिक्षण घेतलेले नाही. अशी शंका निर्माण होत असल्याने ज्या जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांनी माहिती अधिकार कायद्याचे प्रशिक्षण घेतलेले नाही, अशा अधिकाऱ्यांची सूची तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था शासनाने करावी.असे देखील या निवेदनात म्हटले आहे.  

सदर निवेदन हे माननीय तहसीलदार शिरपूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी साहेब धुळे यांना देण्यात आले आहे. तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शिरपूर यांना देखील निवेदन देऊन आपल्या
अधिपत्याखालील सर्व कार्यालयांमध्ये २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा व त्यांना कायद्याबाबत अवगत करावे याबाबत निवेदन देण्यात आले. 

यावेळी संजय नंदुरबारे, पुनमचंद मोरे, संतोष भोई,महेद्र जाधव,आशितोष वाडीले, हिरालाल चौधरी, जितेंद्र पाटील, माधवराव दोरीक,सुभाष भोई, योगेश सूर्यवंशी, अनिल भिल, गणेश बिरारी, मनोज मराठे इत्यादी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध