Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२

संगमेश्वर मध्यम प्रकल्प तुडुंब...

भूम (महेश वाघमारे)दि.२६ धाराशिव जिल्ह्याच्या बहुतांशी भागाचा प्रमुख जलस्त्रोत असणारी मांजरानदी तुडुंब भरली आहे. रविवार आणि सोमवारी झालेल्या पावसाने संगमेश्वर मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. बीड आणि धाराशिव जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे हे धरण आहे.

संगमेश्वर मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरल्याने ईट परिसरातआनंद व्यक्त केला जात आहे. यंदाही निसर्गाने भरभरून दिल्याने सलग तिसऱ्या वर्षी हे धरण तुडुंब भरले आहे.
गेल्या आठ-दहा दिवसांत पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही, तरी नदी नाल्यातून पाणी मात्र धरणात आले. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने मुक्काम ठोकला असून, त्याचा तिस-या दिवशीही जोर कायम होता. ईट परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार सुरूच आहे. सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांत व नागरिकांमध्ये धरण पुर्ण भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध