Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे लाख मोलाचे औषध मातीमोल..!



शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर तालुक्यातील वाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झालेली असून याबाबत आमच्या प्रतिनिधीने प्राप्त केलेल्या माहितीनुसार वाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील इमारतीचे वरच्या छतातून संपूर्णपणे पाणी टपकत आहे. 

 

यामुळे आमच्या प्रतिनिधीने संपूर्ण इमारतीचीच पाहणी केली असता प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध रूममध्ये सतत पाण्याचा होणारा छतातून गळतीमुळे रूममध्ये पूर्णपणे पाणी साचलेले आहे. जसे काही या रूमला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  

यामुळे आरोग्य विभागाने पुरवठा केलेले लाखमोलाचे औषधांची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ते निरुपयोगी होण्याच्या मार्गावर आहेत.  आणि म्हणून परिसरातील सर्वसामान्य जनता व आदिवासी रुग्णांसाठी शासनाने पुरवठा केलेले औषधे आता मातीमोल होणाच्या मार्गावर आहेत. 
        
वाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत तालुका वैद्यकीय अधिकारी शिरपूर यांना दिनांक २०/८/२०२० रोजी याबाबत सविस्तर पत्र व्यवहार केलेला आहे. दिनांक ५/९/२०२० रोजी उपविभागीय अभियंता पंचायत समिती शिरपूर यांना देखील संरक्षण भिंत बांधकाम करून मिळण्याबाबत पत्र व्यवहार केलेला आहे. 

तर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धुळे यांना २०/७/२०२० रोजी इमारत दुरुस्ती बाबत पत्र व्यवहार केलेला आहे.असे असताना देखील यापैकी कोणत्याही विभागाने व कोणत्याही अधिकाऱ्याने त्याची दखल घेऊन वेळीच दुरुस्ती केलेली नाही.  त्यामुळे शासनाने पुरवठा केलेला लाख मोलाची औषधे हे आज मातीमोल होण्याच्या मार्गावर आहेत.आता तरी या अधिकाऱ्यांना जाग येईल का व मातीमोल होणाऱ्या औषधी वाचवण्यात यश येईल का? तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्ण कल्याण समितीवर स्थानिक जिल्हा परिषदेचे सदस्य हे अध्यक्ष असतात.मग हे काय फक्त कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोठेपण दाखवण्यासाठीच आहेत का? असा खडा सवाल परिसरातील नागरिकांनी केलेला आहे.  


आत तरी याकडे पंचायत समिती शिरपूर, जिल्हा आरोग्य विभाग,जिल्हा परिषद धुळे व रूग्ण कल्याण समितीवर स्थानिक जिल्हा परिषदेचे सदस्य यांनी तात्काळ लक्ष देऊन इमारतीची दुरुस्ती करून घ्यावी असे नागरिकांच्या म्हणणे आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध