Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, ११ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा येथील समाजसेवक, शहराध्यक्ष प्रविण माळी यांनी केला बाल रोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करुन वाढदिवस साजरा
शिंदखेडा येथील समाजसेवक, शहराध्यक्ष प्रविण माळी यांनी केला बाल रोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करुन वाढदिवस साजरा
शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी येथील माळी रहिवासी समाजसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष प्रवीण राजाराम माळी यांनी मारोती व्यायाम शाळा येथे आपला वाढदिवस इतर वायफळ खर्च करण्यापेक्षा मित्र परिवारातर्फे शहरातील व वार्डातील लहान बालकांना मोफत बालरोग तपासणी शिबिराचे आयोजन करुन एक अनोखा संदेश ह्या निमित्ताने त्यांनी दिला आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मंडळी हौस व्हावी म्हणून भला मोठा केक, डिजे, मित्रांना पार्टी हयात हजारो रुपये खर्च करून आनंद लुटला जातो. पण शहरात नव्हे तालुक्यात एक अनोखा संदेश देणारा वाढदिवस समाज सेवक तथा भाजपा शहराध्यक्ष प्रवीण माळी यांनी साजरा केला असून ह्या निमित्ताने आर्शिवाद हाॅस्पिटल चे नवजात शिशू व बालरोग तज्ज्ञ डॉ हितेंद्र अशोकराव पवार यांच्या सहकार्याने बालरोग तपासणी शिबिर मोफत खुले केले होते.
जवळपास 150 बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणी फी, औषधे, इ.मोफत उपलब्ध केले.शिबिराचे उद्घाटन गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे व ज्येष्ठ समाजसेवक दयाराम माळी यांनी केले.
प्रसंगी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भिला पाटील,युवराज माळी,प्रा.दिपक माळी, सुनंदा माळी, अँड. विनोद पाटील, अँड. सुभाष जाधव, तुकाराम पाटील, राजु पहाडी, सोमनाथ जाधव, राजेंद्र माळी, अनिल माळी,संजु आप्पा, कुणाल जाधव,चंद्रसिंग परदेशी आदी पदाधिकारी तसेच बालरोग तज्ज्ञ डॉ हितेंद्र पवार, संदीप गिरासे, निलेश सोनवणे, इरफान पठाण यांनी शिबिराचे कामकाज पाहिले. शिबिरात वजन न वाढणे, आहाराविषयी सल्ला व मार्गदर्शन,सृदुढ बालक सल्ला देत खोकला, ताप, सर्दी,कावीळ,बालदमा, डायरिया ,तापात झटके येणे आदी आजारांवर तपासणी व उपचार केले. शिबिरासाठी संत सावता (मारोती) व्यायाम शाळा, महात्मा फुले मित्र मंडळ, श्रीराम मारोती भजनी मंडळ,बाल गोपाल भजनी मंडळ, सावित्रीबाई फुले उत्सव समिती, महात्मा फुले प्रतिष्ठान, ज्ञानज्योती प्रायमरी इंग्लिश स्कूल, संत सावता गणेश मित्र मंडळ यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. ह्यात मित्र परिवाराच्या पुढाकाराने आज माझ्या वाढदिवसाला बालरोग तपासणी शिबिराचे आयोजन करुन वार्ड क्रं 15 मधील माळी वाडा, जनता नगर,साबरहट्टी , यांसह शहरातील विविध भागातून आलेल्या बालकांना मोफत तपासणी करून औषधोपचार देखील केल्याचा मनस्वी आनंद होऊन खरा अर्थाने वाढदिवस साजरा झाला असे मी भाग्य समजतो. तसेच मतदान कार्डाला आधार नंबर जोडणी केंद्रास भेट देऊन मतदारांनी बि एल ओ ला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील काका ,पुतण्या चुलत भाऊ, बहीण असे चार जण राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय...
-
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात एका रुग्णाला चिकुन गुनिया झाल्याचे उघडकीस आले असून नागरीकांनी आता डासांपासून सावध राहण्याची गरज आहे....
-
खरा भूमिपुत्र कोण 2009 ला अनिल दादा विधानसभेला पराभूत झाले, परंतु पराभव विसरून अनिल दादा परत सक्रिय झाले. 2014 ला विधानसभेला परत एकदा पराभव ...
-
भूमिपुत्र व विकास पुरुष म्हणून संपुर्ण शहरात अनिल दादांनाच पसंती- गोपी कासार व नरेंद्र चौधरी अमळनेर- शहरातील सर्वच प्रभागात महायुतीचे उमेदवा...
-
साक्री दि.१५ : रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच बाजारातून डीएपी आणि १०:२६ ही दोन्ही खते गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यासोब...
-
अमळनेर: तालुक्यातील तासखेडा येथे घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी घडली आहे...
-
अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे...
-
शिरपूर प्रतिनिधी - धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा निवडणुक 2024 साठी आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत श...
-
मतदारांच्या मनातील भीती दूर होण्यासाठी इंडोतिबेट व स्थानिक पोलिस पथकाने रूट मार्च काढला अमळनेर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभ...
-
अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणारे चौधरी बंधूंनो, भर चौकात द्या उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी गौप्यस्फोट करीत दिले आव्हान *अमळनेर* (प्रतिनिधी) ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा