Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

ग्रामपंचायत शेवाळी (दा) ता साक्री च्या वतीने लम्पि स्किन आजारावर गुरांसाठी मोफत लसीकरण



प्राण्यांमध्ये आढळणारया लंम्पी या विषाणूजन्य आजाराचे संक्रमण नियंत्रण करण्यासाठी शेवाळी दा गावातील सर्व गुरांसाठी ग्रामपंचायत शेवाळी दा च्या वतीने गुरुवार दि 15सप्टेंबर 2022 रोजी मोफत लसीकरण आयोजित करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात सरपंच सौ चित्रा प्रदिप नांद्रे यांच्या हस्ते पशुपुजा करुन व उपसरपंच श्री अरुणदादा नेरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आली ,ग्रा प सदस्य सौ सुरेखा साळुंके,सौ कविता पगारे,श्री पंढरीनाथ साळुंके,श्री चेतन साळुंके,श्री मछिंद्र गायकवाड,श्री दादाजी बागुल,ग्रामसुधार मंडळ सचिव श्री सुरेशदादा साळुंके,ग्रामसुधार मंडळाचे माजी अध्यक्ष श्री अरुणदादा साळुंके, माजी उपसरपंच श्री माधव नांद्रे,श्री साहेबराव सोनवणे,प्रगतीशील शेतकरी श्री अशोक सुकलाल भदाणे, तसेच श्री नंदकुमार पंडीत साळुंके ,श्री विश्वास सिताराम साळुंके,श्री वसंत गंगाराम साळुंके,श्रीअरुण हिरामण साळुंके,श्री शलिग्राम साळुंके,श्री प्रभाकर साळुंके,श्री उखा पुंजु नांद्रे,श्री पुंजाराम नेरकर आदी शेतकरी बांधव उपस्थित होते ग्रामसेवक श्री मनोहर सोनवणे,लिपिक राजेंद्र सुर्यवंशी,श्री अतुल साळुंके यांनी शिबिराचे संयोजण केले सदर लसीकरण शिबिरासाठी पशुवैदयकिय अधिकारी डॉ योगेश गावित ,डॉ महाले व त्यांचे सहकारी यांनी लसीकरण केले ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ गावित व सहकार्यांचा सत्कार करण्यात आला श्री प्रदिप नांद्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले
मंगल गोशाळेचे श्री मयुर साळुंके,श्री दिनेश प्रभाकर साळुंके,श्री रविंद्र विश्वास साळुंके आदी युवकांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले गावातील 275 गुरांना या शिबिरात लसीकरण करण्यात आले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध