Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

इतिहासातील माझासाठी आठवनीतला दिवस..! अनाहूतपणे पाहुणे घरी आले आणि मनभरून आनंद देवून गेले !




आज ख-या अर्थाने मला माझा जीवन ईतिहासात ईतक्या वर्षातून पहिल्यांदाच आभाळभर आनंद झाला.त्याचे कारण असे की मला नुकताच निसर्ग मित्र समितीचा वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मला न माहीत  करता  आश्चर्य कारक असा प्रसंग बघायला  भेटला.माझा घरी अचानक एक टेंपो आला त्याच्यातून मंडपाचे साहित्य, स्ट्रीट,माईक,खुर्च्या उतरवल्या गेला मंडप  लावला  गेला.तरीपण मला  माहीत नव्हत हे काय सुरू आहे.

मी व्हरांड्यात उभा सर्व बघत  होतो.अचानक जनकल्याण प्रतिष्ठान चे विकास सेन व रामचंद्र तात्या एशी दिसले तेव्हा माझा मनात विचारांची पाल वळवळ करायला लागली.मी  त्यांना विचारले हे काय सुरू आहे ? ते म्हणाले आम्हाला तुमच्या सत्कार  करावयाचा आहे.

मी विनम्रपणे नकार दिला तरी त्यांनी ऐकले नाही.शहरातील अनेक मोठ मोठे मान्यवरांपण त्यांनी बोलावले होते.
मान्यवरांमध्ये नगरसेवक गणेश भाऊ  साळवे,मा.नगरसेवक सुरेशदादा  चौधरी,श्री.शरदराव सुर्यवंशी,
जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना,श्री. शिरसाठ रावसाहेब,श्री.पाटील साहेब.
श्री ईशी साहेब,श्री.किरण पाटील आणी खूप मोठ्या संख्येत मित्रमंडळी आलेली होती. 

काॅलनीतील सहकारी पण येवून गेले.अनेक मान्यवरांनी माझे भरभरून कौतुक केले.मान्यवरांसह आलेल्या  मित्रमंडळीने जो माझा प्रेमपूर्वक  सन्मान केला.तो माझासाठी  अविस्मरणीय असा क्षण होता.
ईतिहासात पहिल्यांदाच ईतक भरभरून प्रेम मला,मिळाले.मुळ सन्मानापेक्षा आजच्या सन्मान माझासाठी शंभर पटीने लाख मोलाचा  होता.अनाहूत पणे,व आश्चर्यकारक  झालेल्या या सन्मानाचे सर्व श्रेय श्री  विकास दादा सेन व श्री.रामचंद्र एशी  यांना जाते.मी त्यांचे आभार न मानता  त्यांच्या ऋणात राहू ईच्छितो,त्यांनी केलेला माझा सन्मान आयुष्यभर  माझा हृदयात घर करून  राहिल या  कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन माझे  मित्र तालुक्यातील सूत्रसंचालनाचे  शहेनशाह श्री,संदिप चौधरी सर यांनी  केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध