Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अभ्यासात सातत्य व संयम आवश्यक- प्रकाश पोळ

जामखेड (राहूल शिंदे) दि.12शहरातील स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्रात झालेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत गटविकास अधिकारी पोळ यांनी सूक्ष्म नियोजन,अभ्यासातील सातत्य व संयम स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी आवश्यक असल्याचे नमूद केले.अभ्यास करताना येणाऱ्या अडचणींचे भांडवल न करता त्यावरती मात करण्याची गरज असते असे सांगितले. 
स्पर्धा परीक्षेतील अभ्यासक्रम, आवश्यक पुस्तके, अभ्यासाचे नियोजन, प्रत्यक्ष परीक्षा देताना घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.  

    कार्यक्रमाचे प्रस्ताविक सोमनाथ शिंदे (संचालक स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड) यांनी केले.यावेळी मयूर भोसले सर,प्रा.कैलास वायकर प्रा.भारत पाटोळे, शिंदे बी. एस. सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगद ढोरमारे  यांनी केले व  उपस्थित मान्यवरांचे आभार ऋतुजा डोंगरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध