Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

भाजपाने दावा केलेल्या शिरपूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर...!



शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आज शिरपूर तहसील कार्यालय येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला आहे.यात तालुक्यातील तब्बल 32 ग्रामपंचायतींवर भाजप पक्षाने एकहाती सत्ता मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे तर एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.

आज निकालानंतर शिरपूर तहसील कार्यालय बाहेर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या ग्रामपंचायतींकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले होते.या 33 ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे


आंबे ग्रामपंचायत पावरा मिनाक्षी प्रितम,भोईटी ग्रामपंचायत पावरा निर्मलाबाई सरदार,बोरपाणी ग्रामपंचायत पावरा जाड्या टाटाण्या,
बुडकी ग्रामपंचायत पावरा इंदिराबाई विश्वास,चांदसे/चांदसुर्या ग्रामपंचायत पावरा कलाबाई दिलीप,चिलारे ग्रामपंचायत पावरा अमोल रविंद्र,दुर्बळ्या ग्रामपंचायत पावरा भिकेश वसंत,हेंदर्यापाडा ग्रामपंचायत पावरा सुनिल भोंग्या,गधडदेव ग्रामपंचायत पावरा ममता आत्माराम,गुर्हाळपाणी ग्रामपंचायत पावरा संगिता शरद,हातेडपाडा ग्रामपंचायत पावरा कविता रमेश,हिगाव ग्रामपंचायत ठाकुर वंदना सुशिल,हिवरखेडा ग्रामपंचायत पावरा रेणुका तुकाराम,जळोद ग्रामपंचायत भिल सीमा लक्ष्मण,जोयदा ग्रामपंचायत पावरा शिला मनोज,पळासनेर ग्रामपंचायत कोळी शितल छोटू,
खामखेडा प्र आंबे ग्रामपंचायत पावरा प्रियंका हिरालाल,खैरखुटी ग्रामपंचायत पावरा जाका धनसिंग,सांगवी ग्रामपंचायत पावरा कनिलाल हिरमल,कोडीद ग्रामपंचायत पावरा आरती प्रकाश,लौकी ग्रामपंचायत भिल अक्काबाई भिमसिंग,लाकड्या हनुमान ग्रामपंचायत पाडवी सुभाष फाफला,मोहिदा ग्रामपंचायत पाडवी दत्तु गुलाब,नांदर्डे ग्रामपंचायत पावरा भारती रामेश्वर,न्यु बोराडी ग्रामपंचायत पावरा कनाशा कुमारसिंग,मालकातर ग्रामपंचायत पावरा कमलाबाई सत्तरसिंग,फत्तेपुर फॉरेस्ट ग्रामपंचायत पावरा ममताबाई मंंगेश,निमझरी ग्रामपंचायत भिल भिकुबाई अंकुश,पनाखेड ग्रामपंचायत पावरा करोतीबाई खुमसिंग,रोहिणी ग्रामपंचायत पावरा आनंदराव गणपत,सुळे ग्रामपंचायत पावरा रविंद्र काशीनाथ,वकवाड ग्रामपंचायत पावरा सुकलाल किसन,झेंडेअंजन ग्रामपंचायत देशमुख रेखाबाई भरत,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध