Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ मार्च, २०२२

हाजरो नागरिकांच्या उपस्थित पेटली नवागांव (बुडकी) येथील होळी....



शिरपुर :- तालुक्यातील बोराडी गावापासून 5 kg असलेल्या नवागांव (बुडकी) येथील होळी पाहण्यासाठी हजारो नागरिकांना हजेरी लावली. रात्रभर पारंपारिक पद्धतीने आदिवासी नृत्य करुन आदिवासी बांधवांनी आपल्या विविधतेने नटलेल्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडविले.


होळी पहाटे पेटविली जाते हि होळी पाहण्यासाठी जिल्हातुनच नव्हे तर महाराष्ट्र राज्य सिमा लगत असलेल्या मध्य प्रदेश राज्यातून हजारे नागरिक व ढोल मोठ्या संख्येने उपस्थित होते.रात्रभर पारंपारिक आदिवासी नृत्य करण्यात आले समुहनृत्याचे दर्शन यावेळी घडले नवागांव गावाच्या रस्त्यावर दुपारपासूनच गर्दी झाली होती यावेळी समुहनृत्य करतांना काली, बाबा आणि बुध्या हे नृत्य आकर्षक ठरले होते.होळी पेटेपर्यंत त्याचे नाचणे व गाणे हि दिनचर्या सुरु असते या वेळी नवस फोडण्यासाठी येथील मोठ्या उत्साहाने साजरा होते.

या वेळी :- लक्ष्मण पावरा (गाव पाटील) जितेंद्र पावरा (युवा कार्यकर्ता), खंडु पावरा (वनकर्मचारी) भारत पावरा (पो.पाटील कोडीद) तसेच मोठय़ा संख्येने नागरिकांनी उपस्थित होते.

जितेंद्र पावरा - युवा कार्यकर्ता


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध