Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ मार्च, २०२२

धुळे जिल्हयातील पिंपळनेर आदिवासी पश्चिम पट्ट्यात होळी (शिमगा) हा सण उत्साहात साजरा



महाराष्ट्रातील आदिवासी जमातीत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. सातपुडा पर्वतरांगां मधील आदिवासी समूहांचा होळी हा आदिम सांस्कृतिक सोहळा! सातपुड्याच्या दऱ्याकपारीत ढोलांचा निनाद घुमू लागतो आणि हजारो स्त्री-पुरुषांची पावलं एका तालात थिरकू लागतात आणि बघता बघता एक अद्भुत आदिम संस्कृती आपल्या पुढे अवतरते. आदिवासी समूहांचं निसर्गाशी असणारं नातं या सण-उत्सवां मधून ठळकपणे समोर येतं. 'होळी' हा असाच या आदिवासींच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा सोहळा! अग्नीची पूजा करणारा आदिवासी खरा निसर्गपूजक होळीद्वारे आपली संस्कृती आजही जपत आहे. 

आदिवासी समूहात असणारी सामूहिक निर्णय प्रक्रिया, एकोपा,बंधुभाव या साऱ्यांचे प्रतीक म्हणजे हा होळीचा सण. मानवी संस्कृतीची मूल्ये जपणारी ही होळी म्हणूनच या आदिवासी समूहांच्या जीवनात महत्त्वाची आहे. प्रत्येकाने एकदा तरी प्रत्यक्ष अनुभवावी अशी ही आदिवासींची सांस्कृतिक होळी.एकूणच मानवतावादी, निसर्गाशी नाळ जोडून ठेवणारी ही अद्भुत,सामूहिक,आदिम संस्कृती 'होळी' या सणामुळे आजही सातपुड्यात टिकून आहे, जिवंत आहे!
 
 तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध