Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १५ मार्च, २०२२

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे भाजयुमोची मागणी 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा



शिरपूर प्रतिनिधी : नव्वदच्या दशकात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूचे वास्तव दाखविणारा चित्रपट द काश्मीर फाईल्स आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी मानसिकतेच्या दहशतवाद्यांनी हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार केले याचे वास्तविक चित्रीकरण या चित्रपटात मांडण्यात आले आहे.
 

मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांचेकडे शिरपूर भाजयुमो तर्फे 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा अशी मागणीचे पत्र पाठवण्यात आले आहे. माजीमंत्री आ.अमरीशभाई पटेल,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा,माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल,धुळे भाजपा सरचिटणीस अरुण धोबी,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशुतोष पाटील,शिरपूर भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील यांचा मार्गदर्शनात शिरपूर भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी यांनी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांना (दि१४ मार्च) रोजी पाठवलेल्या पत्रातुन हि मागणी केली आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की,या चित्रपटात काश्मिरी पंडितांची भीषण अवस्था देखील विशद करण्यात आलेली आहे. 

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेच्या समोर हे भीषण वास्तव मांडले जावे याकरिता हा चित्रपट लवकरात लवकर करमुक्त करावा. आपल्या भावी पिढीपर्यंत अधिकाधिक पोहोचला पाहिजे. जेणेकरून अवघ्या महाराष्ट्राला समजेल.'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट आपण महाराष्ट्रात करमुक्त करावा अशी मागणी शिरपूर भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी यांनी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांना (दि१४ मार्च) रोजी पाठवलेल्या पत्रातुन हि मागणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध