Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

मासे पकडण्यासाठी तापी नदीत गेलेल्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना



दोंडाईचा प्रतिनिधी : मासे पकडण्यासाठी तापी नदीत गेलेल्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भिका रामलाल झिंगा भोई (वय ५० ) रा टाकरखेडा ता शिंदखेडा असे मयताचे नाव आहे. 

१६ रोजी सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे भिका भोई हे मासे पकडण्यासाठी तापी नदीवर गेले होते.दुपारी २ वाजले तरी जेवणासाठी ते घरी आले नाही म्हणून भिका भोई यांचा मुलगा आणि काका लक्ष्मण भोई तापी नदी येथे गेले.त्यावेळी खोल पाण्यात मासे पकडण्याच्या जाळ्यात भिका भोई यांचा पाय अडकलेला दिसला.यानंतर नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध