Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १५ मार्च, २०२२

राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केली तक्रार दाखल



धुळे प्रतिनिधी:राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार केली आहे.प्रवीण चव्हाण स्टिंग ऑपरेशन प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.माध्यम प्रतिनिधीशी बोलताना अनिल गोटे म्हणाले, फडणवीसांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला आहे.

फडणवीस यांच्या विरोधात मी तक्रार केली आहे.असं कुणाचंही कुणाला संभाषण ऐकता येत नाही.ते जाहीर तर करताच येत नाही.पण त्यांनी चोरासारखं ऐकलं.लबाडासारखं रेकॉर्ड केलं.केलं ते खोटं केलं.काही तरी तोडमोड करून, आमचा आवाज तोडमोड करून केलं आहे. हे कृत्य केवळ गुन्हेगारच करू शकतो.या संभाषणानुसार आम्ही काही केलं असतं तर ते खरं ठरलं असतं.आम्ही केलंच नाही. काही झालंच नाही.मी माझ्या केससाठी गेलो होतो.तिथे त्यांनी कॅमेरे लावले.उद्या त्यांच्या घरी कुणी कॅमेरे लावले तर चालेल का त्यांना ? असा साल अनिल गोटे यांनी केला .

ते पुढे म्हणाले,फडणवीसांबद्दल यापूर्वीही मी बोललो आहे.फडणवीस हे लबाड, कपटी,कारस्थानी,दगलबाज आहेत . मराठीतील जेवढी विशेषणे असतील तेवढी कमी पडतील असा माणूस आहे हा,असा हल्ला गोटे यांनी लगावला.चार दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला होता.सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे काही नेत्यांना हाताशी धरून भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात कट रचत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता.त्यांनी चव्हाण आणि काही नेत्यांचं संभाषणही वाचून दाखवलं होतं.त्यात अनिल गोटे यांचंही संभाषण होतं.त्यामुळेच गोटे यांनी आज फडणवीसांविरोधात तक्रार दाखल केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध