Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १४ मार्च, २०२२

खानदेश चे कॉग्रेस नेते मा.शाम सनेर यांच्या पाठपुराव्याला यश, शिंदखेडा तालुक्यात फिरते पशुचिकित्सक अँब्युलन्स मंजुर....



मुख्यमंत्री पशु स्वास या कार्यक्रमांतर्गत आज शिंदखेडा तालुक्याचा समावेश महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण तथा पशुसंवर्धन मंत्री नामदार सुनील जी केदार साहेब यांनी केलेला आहे दिनांक 14 मार्च म्हणजेच आजच शासनाचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
गेल्या महिन्यात पशुसंवर्धन मंत्री मालपुर तालुका शिंदखेडा येथे दौऱ्यावर आलेले असताना मा.जि.प. सदस्य हेमराज नाना पाटील, प्रकाश पाटील, रावसाहेब पवार, राजेंद्र देवरे, विरेंद्र झालसे, महेंद्र पाटील, आबा मुंडे, शामकांत पाटील , नरेंद्र पाटील, प्रविण पवार, भैय्या माळी, विलास गोसावी या सर्व तालुक्यातील पदाधिकारी व पशुधन पालक शेतकऱ्यांनी माननीय मंत्री महोदय यांच्या कडे पशु वैद्यकीय पथक उपलब्ध होत नसल्याबाबत तक्रार केली होती त्या अनुषंगाने मंत्री महोदय यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या आणि आज या संदर्भात शासनाने आदेश पारित करून शिंदखेडा तालुक्यातील पशुधन शेतकऱ्यांना एक सुखद धक्का दिलेला आहे पशुधनाच्या आरोग्यासाठी हे फिरते पथक ॲम्बुलन्स शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकरी वर्गाला त्याचा फारच मोठा फायदा होणार आहे . या फिरत्या पशुवैद्यकीय वाहन मंजूर मुळे पशुधन पालकांना मध्ये समाधान व्यक्त करत आहेत....

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध