Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ मार्च, २०२२

निसर्ग मित्र समिती शिरपूर यांचेकडून तहसिलदार आबा महाजन यांच्यामार्फत निवेदन..! एक गाव एक होऴी उपक्रम राबवा



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना एक गाव-एक होळी अभियान राबविण्यासंदर्भात निसर्ग मित्र समिती शिरपूर यांचेकडून तहसिलदार आबा महाजन यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.निसर्ग मित्र समिती धुळे मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र भेट देण्यात आले.

आज्ञापत्र व निवेदन देतेवेळी निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे जिल्हा सहकार्याध्यक्ष शरद सूर्यवंशी,
जिल्हाउपाध्यक्ष मनोहर पाटील हे उपस्थित होते.पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड करून वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज असून होळी निमित्ताने होणारी वृक्षतोड व पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी एक गाव एक होळी अभियान राबवून पर्यावरणाच्या राष्ट्रीय उपक्रमाला प्राधान्य द्यावे.तसेच ज्याप्रमाणे एक गाव एक गणपती हे अभियान राबविले जाते त्याच धर्तीवर एक गाव - एक होळी हा कार्यक्रम राबविण्यात यावा. हे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय संबंधित अधिकारी तसेच गावातील सरपंच , ग्रामसेवक यांना सूचना देऊन सर्व ग्रामस्थांना गाव पातळीवर अवगत करावे . आपल्या परिसरातील वृक्षांचा सांभाळ करून एक गाव - एक होळी या अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा अशा आशयाचे निवेदन तहसिलदार आबा महाजन यांना देण्यात आले.

यावेळी निसर्ग मित्र समिती शिरपूर तालुकाअध्यक्ष सुनील चव्हाण,उपाध्यक्ष श्रीराम सोनवणे,प्रसिद्धीप्रमुख मनोहर शिंदे, संघटक उपेंद्र पाटील,गिरीश गांगुर्डे, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध