Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ मार्च, २०२२

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्य ची पोलिस प्रशासनास आठवन करून द्यावी लागेल काय ? डिके नगर पोलिस चौकीत (गंगापूर)राञीची ओली पार्टी करताना रंगेहाथ पकड़ले. चार पोलीस क्रर्मचारी निलंबित




नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्टी करताना आढळून आले, चौकीत तक्रार दाखल देण्यासाठी नागरिक गेले असता,हा प्रकार उघडकीस आला आहे.याचाच अर्थ पोलीस प्रशासनातील काही आश्या मुजोर पोलीसाना आपल्या खांद्यावर असलेल्या ब्रीद वाक्वाची विसर पडलेली आहे.असेच वाटते

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीद वाक्य आहे.पण याचा अर्थ अजुनही सर्व सामान्य जनताला पूरेपुर माहित नाही.याचा अर्थ असा की,महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत.

शिंदे नामक व्यक्ती टवाळखोर यांची तक्रार देण्यासाठी या डिके नगर पोलीस चौकी मध्ये गेले होते,तेव्हा पाच ते सहा पोलीस कर्मचारी दारू पीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी लगेच आपला मोबाईल काढून या पोलिसांचं चित्रीकरण केलं संतापलेल्या पोलिसांनी शिंदे यांना मारहाण करत तिथून पळ काढला.गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डिके नगर येथील पोलीस चौकीत काल रात्रीच्या सुमारास ४ ते ५ कर्मचारी दारू पीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या डिके नगर मध्ये असलेल्या पोलीस चौकीतच पोलिसांची दारूची पार्टी सुरू असल्याचा प्रकार स्थनिकांनी समोर आणला या बाबत नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी या दारू पार्टीत सहभागी असलेल्या ४ पोलिसांना तात्काळ निलंबित केलं असून या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशीचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिले.

तर पान टपरी सारख्या असलेल्या या पोलीस चौकी मध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील कामाला उत्साह नसतो तरी लोकप्रतिनिधींनी पोलिसांना उपयुक्त अशी पोलीस चौकी देखील बनवून द्यावी, अशी मागणी नाशिक पोलीस आयुक्तांनी केली तर शहरातील ज्या पोलिस चौक्या तात्पुरत्या अथवा परवानगी नसलेल्या आहेत त्या तात्काळ बंद करण्यात येतील. व नवीन पोलीस चौकीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल असे देखील आयुक्त पांडेय यांनी सांगितलं.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध