Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ मार्च, २०२२

राज्यात हजारो बोगस शिक्षक 'या' जिल्ह्यात सर्वाधिक..



टीईटी पदीक्षा घोटाळा समोर आल्यानंतर दिवसेंदिवस त्यामध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत.आता शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 7 हजार 800 बोगस शिक्षकांची यादी समोर आली असून संपूर्ण राज्यात हे बोगस शिक्षक सापडले आहेत. पुणे पोलिसांकडून राज्यात विभागनुसार त्याचबरोबर 36 जिल्ह्यामध्ये किती बोगस शिक्षक आहेत,याचा आकडा समोर आला आहे. 

यात सर्वाधिक नाशिक येथे 1154 बोगस शिक्षक असून तर सर्वात कमी 09 बोगस शिक्षक हे गोंदिया येथे असल्याची माहिती समोर आली आहे.पुणे पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांनी आरोग्य विभाग,म्हाडा आणि टीईटी परीक्षेचा गैरव्यवहार उघडकीस आणला होता.टीईटी परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती. 

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी केली.त्यावेळी 2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 592 परीक्षार्थींना पात्र केल्याचे दिसून आले.प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थी हे अपात्र होते.तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध