Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ मार्च, २०२२




देशात सध्या द काश्मीर फाईल्स चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहे.या चित्रपटाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत चर्चा करुन हा चित्रपट पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले.जम्मू काश्मीरमधून जे काश्मीरी पंडित स्थलांतरित झाले आणि त्यांची नंतर दयनीय अवस्था झाली त्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की,या प्रकारची सत्य बाहेर आली पाहिजे.जे सत्य अनेक वर्षांपासून दडपून ठेवले होते,ते या चित्रपटाच्या माध्यमातून सांगितले गेले आहे. 

आणि ज्यांना या चित्रपटातील गोष्ट खरी वाटत नाही त्यांनी दुसरा चित्रपट बनवावा असेही त्यांनी सांगितले.त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत नरेंद्र मोदी यांना सवाल उपस्थित केला की,त्यांचा कळवळा एवढा जाणवत असेल तर गेल्या सात वर्षात विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी मोदी सरकारने काय केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांवर बोलताना अर्थसंकल्पाचाही विषय उचलून धरला.त्यांनी यावेळी मोदी सरकारला जम्मू काश्मीरमधील पंडितांचा कळवळा येत आहे तर मग त्यांच्यासाठी मोदी सरकारने स्वतंत्र काय तरतूद केली आहे.त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणते नवीन कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यांची परिस्थिती सांगत असताना गेल्या साठ वर्षाचा निर्वाळा तुम्ही किती दिवस देणार आहात आणि आता तुम्ही गेल्या सात वर्षात त्यांच्यासाठी काय केले आहे. 

असा सवाल त्यांनी उपस्थित केला.सध्या सत्तेत असलेल्या केंद्र सरकारने काश्मिरी नागरिकांसाठी हजारो नोकऱ्या देण्याचे अश्वासन दिल्याचा आरोप करत त्यांच्यासाठी आतापर्यंत काहीच केले नसल्याचे सांगितले.त्यामुळे मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्यासाठी प्रत्यक्षात काय झाले हे जाणून घेण्याची खरी गरज आहे असे मतही सुप्रिया सुळे यांनी मांडले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध