Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ मार्च, २०२२

शिरपूर तालुक्यात कंपनीतून लाखोंचे साहित्य चोरी गुन्हा दाखल




शिरपूर प्रतिनिधी:तालुक्यात शिरपूर-चोपडा रस्त्यावरील अहिल्यापूर फाट्याजवळ असलेल्या ब्रह्मा कॉट प्रा लि या कंपनीतून अकरा लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक्स बोर्ड चोरी झाल्याची घटना घडली आहे.चोरी झालेल्या एकूण किंमत ११ लाख रुपये आहे.याप्रकरणी कंपनीचे कर्मचारी धनंजय राजेंद्र गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.कंपनी परिसरात वारंवार चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध