Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

आंगणवाडी शिक्षिका, सेविका आणि आशा वर्कर्सचे "अच्छे दीन कधी येणार ?" खासदार इम्तियाज जलील साहेबांनी संसदेत व्यथा मांडल्या...



खासदार इम्तियाज जलील साहेबांनी संसदेत आंगणवाडी शिक्षिका, सेविका आणि आशा वर्कर्स हे वर्षानुवर्षे देत असलेल्या सेवा विशेष म्हणजे कोरोना काळात केलेल्या कामाचा गौरव केला. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आणि महिला व बालकांच्या आरोग्य विषयक योजना हे आंगणवाडी आणि आशा सेविका यांच्यावरच अवलंबून असून लसीकरण मोहिमेत सिंहांचा वाटा असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यानी संसदेत मांडली.अविश्वसनीय व प्रशंसनीय काम करणाऱ्या आंगणवाडी शिक्षिका,सेविका आणि आशा वर्कर्स यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे; 

त्यांच्या कामाचा कोणीच मोबदला देवूच शकत नाही परंतु कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी त्यांना अतिशय तुटपुंजे मानधन शासनातर्फे दिले जाते ही बाब शर्मसार करणारी असून त्यांनी जीव धोक्यात घालून केलेल्या कामाचा श्रेय केंद्र आणि राज्य शासन घेत असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील साहेबांनी संसदेत लावला. 
          
आंगणवाडी आणि आशा सेविका कोणत्याही बिकट परिस्थितीत आणि महामारीच्या काळात कशा प्रकार काम करतात त्याचे उदाहरण देवून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची वाचा फोडली. गावागावात जीवघेणा प्रवास करून वैद्यकीय सेवा देवून असंख्य महिला व बालकांना जीवनदान देणाऱ्या सेविकाच मरणयातना भोगत असल्याने त्यांना न्याय देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील साहेबांनी संसदेत केली. 
          
आंगणवाडी शिक्षिका,सेविका आणि आशा वर्कर्स यांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करून त्यांना शासनस्तरावर विविध लाभ देवून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील साहेबांनी संसदेत केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध