Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाचे मागील चार महिन्याचे थकीत मानधन तात्काळ मिळावे व इतर प्रश्न त्वरीत सुटावे यासाठी शिरपूर प्रांताधिकारी व पंचायत समिती कार्यालय समोर लाटणे मोर्चा काढून आंदोलन
शिरपूर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाचे मागील चार महिन्याचे थकीत मानधन तात्काळ मिळावे व इतर प्रश्न त्वरीत सुटावे यासाठी शिरपूर प्रांताधिकारी व पंचायत समिती कार्यालय समोर लाटणे मोर्चा काढून आंदोलन
शिरपूर प्रतिनिधी: - शिरपूर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाचे मागील चार महिन्याचे थकीत मानधन तात्काळ मिळावे व इतर प्रश्न त्वरीत सुटावे यासाठी शिरपूर प्रांताधिकारी व पंचायत समिती कार्यालय समोर लाटणे मोर्चा काढून आंदोलन दि 14 रोजी करण्यात आले.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाचे ४ महिन्यांचे थकीत मानधन तात्काळ मिळावे. केंद्र शासनाच्या सुधारीत प्रत्रानुसार ऑक्टोबर २०२१ पासून कोविड प्रोत्साहन भत्ता आशा स्वयंसेविकांना १ हजार रुपये व गट प्रवर्तकांना ५०० रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. त्यांची अंमलबजावणी व्हावी.आशा व गटप्रवर्तकाचा ऑक्टोंबर २०२१ पासूनचा थकीत मोबदला त्वरीत मिळावा. आशा व गटप्रवर्तकांची उपासमार त्वरीत थांबावावी. १७ जुलै २०२० शासन निर्णयानुसार आशा स्वयंसेविकांना रु. २ हजार व गटप्रवर्तकांना रु. ३ हजार रुपयांची
वाढ केली आहे. तो सप्टेंबर २०२१ पासून थकीत मोबदला आहे. जानेवारी २०२२ पर्यंत त्वरीत अदा करण्यात यावा. त्यात कुठलीही कपात करण्यात येवू नये. १२ जून २०२१ रोजी आरोग्य मंत्री यांच्या सोबत झालेल्या कृति समितीच्या बैठकित चर्चेनुसार जुलै २०२१ पासून आशा स्वयंसेविकांचा मोबदला १ हजार रुपये व गटप्रवर्तकाचा मोबदल्यात १ हजार २०० रुपये दरमाहा वाढ व कोरोना विषाणू प्रादुर्भाव असे पर्यंत ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता ठरल्याप्रमाणे त्वरीत मिळावा. गोवर रुबेला मोहिम २०१८ मध्ये कामाचे मानधन त्वरीत मिळावे. इंद्रधनुष्य अभियानाचे थकीत मानधन त्वरीत मिळावे. आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन मिळावे पाहिजे. व शासकीय कर्मचारीचा दर्जा मिळाला पाहिजे या मागणीसाठी निवेदन सादर करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष आशा व गटप्रवर्तक संघटना अॅड. हिरालाल परदेशी, तालुकाध्यक्ष आशा व गटप्रवर्तक संघटना अॅड. संतोष पाटील, जिल्हा सल्लागार आशा व गटप्रवर्तक संघटना अॅड. मदन परदेशी, तालुकाकार्याध्यक्ष आशा व गटप्रवर्तक संघटना डॉ. किशोर सुर्यवंशी, आशा स्वयंसेविका स्मिता दोरीक, गटप्रवर्तक अरुणा देवरे, पुष्पा महाजन, प्रतिभा पाटील, आशा महिरसळे, वैशाली बारी, मालवी इंदवे, सविता धर्माधिकारी, ठगु बुवा आदींसह आशा कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणावर आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे गावाच्या शेतकऱ्यांना आमदार मंजुळाताई व धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख श्री तुळशीराम गावित यांच्या विशेष प्रयत्नमुळे ट्र...
-
विद्यार्थी-विद्यार्थींना खुलेआम अश्लील चाळे करण्यासाठी पडदे लाऊन सोय करुन देणाऱ्या कॅफे चालकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत असू...
-
शिरपुर शहर पोलीस स्टेशन आवारात मागील काही वर्षापासुन विवीध कंपन्यांच्या 113 मोटार सायकल बेवारस पडुन आहेत. सदर मोटार सायकल ताब्यात घेण्यासाठी...
-
गाव पातळीवरील माहितीने महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यात पोलीस पाटलांची मदत- माजी मंत्री अनिल पाटीलमारवड येथे पोलीस पाटील दिनानिमित्त जिल्ह्यातील पोलीस पाटलांची कार्यशाळा संपन्न प्रतिनिधी अमळनेर- पोलीस व महसूल प्रशासनातील महत्वाचा दुवा म्...
-
जळगाव जिल्ह्याला पुन्हा ५८ हजार ४७९ घरकुल उद्दिष्ट मिळाले. अमळनेर : पंतप्रधान आवास योजनेनंतर्गत तालुक्यासाठी २७ जानेवारीला ५ हजार ५...
-
धुळे (प्रतिनिधी)- तालुक्यातील नंदाणे येथील लाचखोर सरपंच व माजी सरपंच धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. सरपंच रविंद्र पाटील व माजी सरपंच अतु...
-
पती गंभीर जखमी,एस टी चालकाविरुद्ध फिर्याद अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ शिवारात धुळे रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कुल जवळ एस टी बस व दुचाकी ...
-
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांचा टेकू घेऊन भाजप प्रणित एनडीए सरकार सत्तेत आल...
-
विझास्ट हा दृष्टिहीनांना मदत करणारा छोटासा डिव्हाईस आहे. आगपेटीएवढा हा डिव्हाईस छातीवर लावून ठेवता येतो,आणि समोर दिसणाऱ्या वस्तूंचे वर्णन कर...
-
अमळनेर : प्रशासनाच्या सतर्कतेने बालविवाह रोखण्यात आला असून अल्पवयीन मुलीच्या पालकांना पोलिसांनी सक्त ताकीद देऊन सोडले आहे. मुलीला बाल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा