Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपुर येथील श्री.खंडेराव बाबा देवस्थानच्या यात्रेस आजपासून प्रारंभ, मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहाने महाआरती कार्यक्रम संपन्न!
शिरपुर येथील श्री.खंडेराव बाबा देवस्थानच्या यात्रेस आजपासून प्रारंभ, मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहाने महाआरती कार्यक्रम संपन्न!
शिरपुर (प्रतिनिधी):-आज सकाळी 9:30 वाजता शिरपुरचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज मंदिराच्या 270 व्या यात्रोत्सवाची महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.महाआरती चे प्रमुख मानकरी शिरपूरचे उपनगराध्यक्ष श्री.भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
याप्रसंगी आमदार श्री काशिरामदादा पावरा,भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.बबनराव चौधरी,माजी नगराध्यक्ष श्री.प्रभाकरराव चव्हाण,कृउबा समिती सभापती श्री नरेंद्रसिंह सिसोदिया, उपविभागीय पोलिस अधीक्षक श्री अनिल माने,प्रांताधिकारी श्री.प्रमोद भामरे, तहसीलदार श्री आबा महाजन,वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.रविंद्र देशमुख,उप अधीक्षक भूमि अभिलेख शिंदखेडा श्री.दत्ताजी वाघ,आरसीपटेल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री.राजगोपाल भंडारी, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष श्री.के.डी.पाटील,मर्चंट बॅंक चेअरमन श्री प्रसन्न जैन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्री रजेसिंह राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री.शिरीषदादा पाटील, शिवनपाचे माजी मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री.सुरेश बागुल, शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्री.मनोज धनगर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्री.भरतसिंह राजपूत,माजी उपनगराध्यक्ष श्री.वासुदेव देवरे,नपा प्रशासकीय अधिकारी श्री.संजय हासवानी,सर्वश्री नितिन बाबा गिरासे,
सुभाषदादा कुलकर्णी,बापू पाटील,हभप सतिषजी भोंगे महाराज,दिलीप अप्पा लोहार,महेश लोहार,जगदीश कलाल, संजय चौधरी,दिनेश साहेबराव पाटील, किशोरभाऊ माळी,प्रकाश गुरव,भालेराव माळी,सचिन सूर्यवंशी,राजेश गुजर, अविनाश शाह,मिलिंद पाटील,विजय तिवारी, हर्षल गिरासे,विनायक वाघ, डॉ.योगेश जाधव,पत्रकार सचिन पाटील, पत्रकार मनोज भावसार,पत्रकार संतोष भोई राजूभाऊ भावसार,भिकाभाऊ चव्हाण,राजेश मारवाडी,रामदास पुरी, संजय पाटील,अरुण धोबी इ.सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न स्वरकोकिळा स्व.लतादीदी मंगेशकर, स्व.मम्मीजी उर्फ श्रीमती हेमंतबेन रसिकलाल पटेल,नगरसेवक स्व.श्री चंदनसिंह राजपूत,हाँटेल व्यावसायिक श्री.देवबा माळी (व्यंकाभाऊ) इ.सहित दिवंगत मान्यवरांना ,कोविड मध्ये निधन झालेल्या नागरिकांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आपल्या प्रास्ताविकांत श्री खंडेरावबाबा संस्थान चे अध्यक्ष श्री कैलासभाऊ धाकड यांनी सांगितले कि,सन 2020 पर्यंत यात्रोत्सव अखंडपणे सुरू होता.परंतु सन 2020 आणि 2021या गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडेराव बाबा मंदिर यात्रेस परवानगी दिली नाही.देवदर्शना करिता मात्र परवानगी देण्यात आलेली आहे.कोविड नियमांचे पालन करुन विश्वस्त मंडळाने यात्रेकरू भाविकांची देवदर्शनासाठी सोय केली आहे.
लोकवर्गणीतून मंदिर विश्वस्तांची यात्रेसंबंधी कार्ये सुरू आहेत. मंदिर परिसरासमोरील पटांगणावर आयोजित एक छोटेखानी कार्यक्रमात मान्यवर प्रमुख पाहुणे सर्वश्री भूपेशभाई पटेल, आमदार काशिरामदादा पावरा, प्रभाकरराव चव्हाण, बबनराव चौधरी यांनी मार्गदर्शन केले.तसेच श्री.भूपेशभाई पटेल यांनी कै.पप्पाजी ऊर्फ रसिकलालजी चुनिलालजी पटेल,कै.मम्मीजी उर्फ हेमंतबेन रसिकलाल पटेल,कै.मुकेशभाई रसिकलाल पटेल,कै.तपनभाई मुकेशभाई पटेल यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी 11111/- रुपये यात्रेसाठी विश्वस्त मंडळास देणगी दिली.तसेच नपाचे निवृत्त सॅनिटरी इन्स्पेक्टर श्री.संतोष भाऊ आणि सौ.हिराबाई संतोष मराठे यांचेकडून सुध्दा रुपये 11111/- ची आणि गं.भा. पद्माबाई शालिग्राम सेठ नेरकर यांचे सुपुत्र श्री.प्रशांतभाऊ नेरकर यांनी रुपये 7111/- ची देणगी तसेच गं.भा.इंदूबाई मन्सारामसेठ भामरे यांचे नांवे अर्थेकर श्री.संजयकुमार भामरे यांनी रुपये 7111/- ची देणगी दिली.अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ,सचिव यांनी श्री.खंडेराव बाबा संस्थान च्या वतीने सर्व देणगीदात्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.शेवटी आभार प्रदर्शन उपाध्यक्ष श्री.संजयभाऊ आसापुरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव गोपालभाऊ मारवाडी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.खंडेराव बाबा संस्थान चे अध्यक्ष कैलासभाऊ धाकड,उपाध्यक्ष संजय भाऊ आसापुरे,कार्याध्यक्ष साहेबराव महाजन, कोषाध्यक्ष किरणभाऊ दलाल, सचिव गोपालभाऊ के.मारवाडी,प्रमुख विश्वस्त गुलाबनाना भोई,संजय भास्करराव पाटील, शरद शेडूराम अग्रवाल,सुभाष भाऊ भोई,श्रीहरी यादगिरीवार,जगदीश बारी,गजानन मगरे,राजेंद्र येशी ,गोरख बारी,अप्पासाहेब मोरे,भानुदास मोरे, मॅनेजर महेश देवकर,सहायक अरविंद राजपूत,पवन बुवा व पुजारी मोरे बंधुं इ.नी विशेष परिश्रम घेतले.शेवटी चहापान करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात आज दिनांक 2 मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास येथील स्थानिक गौरक्षकांना गोपनीय माहिती...
-
शिरपुर प्रतिनिधी- शिरपूर तालुका म्हटले म्हणजे सर्वप्रथम सर्वसामान्याच्या डोळ्यासमोर येते ते, शिरपुर नगरचे भाग्यविधाते व विकासपुरुष मा, आमदार...
-
शाहदा प्रतिनिधी:- शहादा तालुक्यातील तोरखेडा येथून सकाळी 7.30 वाजता शिरपूरकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या MH.41.V.0014 क्रमांकाच्या गाडीला ...
-
रणाईचे येथे भक्तनिवास सह विविध विकास कामांचे भूमिपूजन अमळनेर-तालुक्यातील रणाईचे येथील श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिरातील महंत बाबांचा मला न...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यासह मध्यप्रदेश व इतर राज्यात बॅग लिफ्टिंग सह ,बँकेतून काढलेले पैसे लंपास...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर:- तालुक्यातील मुंगसे येथील २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना २५ रोजी सायंकाळी...
-
मोफत वीज, वाढीव अनुदान आणि वेगवान गृहनिर्माण... प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी! केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शा...
-
तरूण गर्जन रिपोट अमळनेर प्रतिनिधी :- तालुक्यातील मुंगसे येथील २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना २५ रोज...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथे खोटी माहिती व कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत चारशे बोगस मतदाराची नावे समाविष्ट करण्या...
-
शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला नाशिक येथून घेतले ताब्यात अमळनेर : सात महिन्यांपूर्वी निसर्डी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला गर्भवती करण...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा