Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,पांझरा कांन साखर कारखाना वर भांडणे गावचे माझी सरपंच,कामगार,शेतकरी, यांचा उपस्थितीत समन्वयक बैठक पार पडली



आज दिनांक १३/०२/२०२२ वार-रविवार रोजी अवघ्या तालुक्याचं वैभव असलेल्या श्री.पांझराकान सह.साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देणे बाबत निवडक शेतकरी आणि कामगार व कारखाना वसाहतीतील कामगारांच्या मुलांच्या उपस्थितीत समन्वय बैठक झाली
सदर बैठकीत कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन चालवण्यासंदर्भात करार तथा कामगारांच्या मुलांसाठी नोकरी संदर्भात, साखर उत्पादन व्यतिरिक्त इतर उत्पादने आणि कामगार हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माननीय श्री.पवन मोरे ( कारखाना भाडेतत्त्वावर घेणारे) यांनी मार्गदर्शन केले.
सदर बैठक सुरू होण्यापूर्वी मा.श्री.पवन मोरे यांचा सत्कार भाडणे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मा.श्री. धनंजय अहिरराव यांचे हस्ते करण्यात आला, सदर सत्कारावेळी श्री. मदनमामा देवरे, श्री.भाऊसाहेब सोनवणे, श्री.सुनिल मोरे,श्री.दिपक बोरसे आदी कारखाना वसाहत परिवारातील सदस्य उपस्थित होते

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध