Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

शिंदखेडा तालुक्यातील घटना कमखेडा शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ! वासराचा फडशा पाडला,वेळीच शेतकऱ्याने बाकी जनावरे सोडल्याने वाचली!!



प्रतिनिधी : शेतात बांधलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला चढवला. वासराला घेऊन गेल्यानंतर घाबरलेल्या शेतकऱ्याने तातडीने बाकीची जनावरे सोडून गावात धूम ठोकली.११ फेब्रुवारीला मध्यरात्री ही घटना कमखेडा (ता. शिंदखेडा) शिवारात घडली. 

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हल्ला करणारा बिबट्याच असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, घटनेचा पंचनामा केला आहे. शेतकऱ्यांना शेतशिवारात एकटे न फिरण्याचे आवाहन करत पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधण्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

संजय कोळी (रा.कमखेडा) यांच्या गावाजवळील शेतात दोन बैल, दोन गायी व वासरू त्‍यांनी बांधले होते व ते स्वतःही शेतातच मुक्कामी होते. मध्यरात्री बिबट्याने जनावरांवर हल्ला चढवला. वासराला ओढत नेत बिबट्याने ठार केले. शेतकरी कोळी सतर्कता राखत अन्य जनावरे सोडली आणि गावात निघून आले. 

पंचायत समिती सभापती अनिता पवार, माजी पंचायत समिती सदस्य भरत पवार यांना त्‍यांनी घटना कळवली.सभापती सौ. पवार यांनी वनविभागाला व पशुचिकित्सक विभागाला पंचानामा करण्याचे आदेश केले.त्यानंतर वनपाल नितीन मंडलीक,वनरक्षक रवींद्र वाघ, पशुधन पर्यवेक्षक युवराज देसले यांनी घटनास्‍थळाची पाहणी करून पंचनामा केला. 

दरम्‍यान, घटनेबद्दल सभापती सौ. अनिता पवार म्हणाल्या,की शेतकऱ्याने आम्हाला माहिती दिल्यानंतर मी वनविभाग,पशु विभागाला पंचानामा करण्याचे सूचित केले.शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने सतर्क राहून या भागात कॅमेरे बसवून हा भाग निरिक्षणात ठेवावा अशा सूचना केल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध