Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

पत्रकार परिषदेतुन खुलेआम शीवीगाळ करणारे खा.संजय राऊतांना राज्यसभेतून निलंबित करा ; नाशिकमधून थेट उपराष्ट्रपतींना पत्र



नाशिक। प्रतिनिधी: पत्रकार परिषदेतुन खुलेआम शीवीगाळ करणारे शिवसेना खासदार संजय राऊत साधु संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत.वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणार्‍या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य या संवैधानिक पदावर राहण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही,असा घणाघात करत त्यांचे राज्यसभेतून निलंबित करा,अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी उपराष्ट्रपतींकडे पत्राद्वारे केली आहे.

भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राज्यसभेचे सभापति तथा उपराष्ट्रपति वेंकैय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे.त्यात म्हटले आहे की,श्री.वेंकैया नायडू यांनी शिवराळ खासदार संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करावे,अशी आक्रमक मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध