Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

    सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

    चिंचपूर(बु)शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अनभुले,तर उपाध्यक्ष देवकर


    परंडा (राहूल शिंदे)दि.16 तालुक्यातील चिंचपूर (बु) येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली.यावेळी अध्यक्ष म्हणून संदीपान(संजय) अनभुले व उपाध्यक्षपदी बुवासाहेब देवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


    तसेच सदस्य म्हणून रेश्मा पठाण,
    बाळासाहेब मोरे,शुभांगी कुंभार,सिद्धार्थ सावंत,बापू देवकर,भाग्यश्री देवकर,शीतल सुतार, दत्तात्रय काशीद,विलास शिंदे तर विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानेश्वरी भराडे,आरव जाधव व सचिव म्हणून पांडुरंग मोहळकर यांची निवड झाली.गटशिक्षणाधिकारी कार्यालय परंडा यांच्यावतीने निरीक्षक म्हणून केंद्रप्रमुख संतोष देवकर यांनी काम पाहिले.यावेळी युवानेते अनिल पाटील,
    पांडुरंग शिंदे,लक्ष्मण शिंदे,दत्ता साठे,दत्ता घिगे आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थितीत होते.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा

    प्रसिद्ध