Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

अमळनेर येथे अंगणवाडी सेविकांचे शिशुपोषण विषयक शिबीर संपन्न..!



एकात्मिक बाल विकास सेवा योजना (नागरी)जळगाव या प्रकल्पांतर्गत अमळनेर आणि चोपडा नागरी विभागात कार्यरत अंगणवाडी सेविकांचे शिशु पोषण विषयक एकदिवशीय प्रशिक्षण जुना टाऊन हॉल येथे नुकतेच पार पडले.
सदर प्रशिक्षणात बाळाच्या जीवनातील पहीले 1000 दिवसांचे महत्व सांगत  बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. विजयसिंह परदेशी यांनी मार्गदर्शन करत बाळाच्या बौद्धिक तसेच शारीरिक क्षमता वृद्धिसाठी सदर दिवस महत्वपूर्ण असतात म्हणून अंगणवाडी सेविकांनी याबाबत गरोदर व स्तनदा मातांना गृहभेटी दरम्यान सविस्तर माहिती देऊन जनजागृती करावी,शिशुपोषण हि एक चळवळ होऊन तिचे जन आंदोलनात रूपांतर व्हावे असे  श्री.परदेशी यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना सांगितले.


या प्रशिक्षणात युनिसेफचे राज्य सल्लागार डॉ.श्री.पी.डी.सुदामे यांनी शिशुपोषण बाबत अंगणवाडी सेविकांना शास्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण देत गरोदर मातेला दिवसातून किमान चार वेळा सर्व अन्नघटकांचा समावेश असलेला आहार द्यावा,बाळाला जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान करावे आणि सहा महिने फक्त आईचेच दूध बाळाला पाजावे,बाळ सहा महिन्याचे पूर्ण झाल्यावर घरगुती स्वच्छता पूर्वक बनवलेला पुरेसा द्यावा,स्‍तनपान करतांना किंवा आहार भरताना बाळाशी संवाद साधावा याबाबत मार्गदर्शन करतांना स्तनपानाच्या कौशल्याचे प्रशिक्षण दिले. 
        
प्रशिक्षणादरम्यान आलेल्या पाहुण्यांचे सौ.उषा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर सौ.सुचिता पाटील, श्रीमती शिला बोरसे,श्रीमती शरयु शिंपी यांनी प्रात्यक्षिकांत सहभाग नोंदविला.सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षिका श्रीमती एस.वाय.सोनवणे आणि श्रीमती पी.आर.तडवी यांनी प्रयत्न केला. प्रशिक्षणामध्ये चोपडा व अमळनेर नागरी  विभागातील सुमारे ४० अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदवला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध