Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
अखिल भारतीय ओबीसी भटके, विमुक्त फेडरेशनच्या अध्यक्ष पदी माजी खासदार हरीभाऊ राठोड तर सरचिटणीस पदी डाॅ. पी. बी. कुंभार याची निवड
अखिल भारतीय ओबीसी भटके, विमुक्त फेडरेशनच्या अध्यक्ष पदी माजी खासदार हरीभाऊ राठोड तर सरचिटणीस पदी डाॅ. पी. बी. कुंभार याची निवड
पुणे- राष्ट्रीय ओबीसी महासंघ पुरस्कृत अखिल भारतीय ओबीसी भटके, विमुक्त फेडरेशनची पहिली जनरल सभा दि.१३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता उद्यान प्रसाद कार्यालय, पुणे येथे संपन्न झाली. यावेळी कर्मवीर डॉ. प्रल्हाद वडगांवकर यांनी थोडक्यात फेडरेशन चे स्थापना, ध्येय, धोरणे सांगितले. उपस्थित सभेमध्ये सर्वानुमते अखिल भारतीय ओबीसी भटके, विमुक्त फेडरेशनचे अध्यक्षपदी माजी खासदार तथा मा. आमदार हरिभाऊ राठोड, तर राष्ट्रीय ओबीसीचे महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी चे अध्यक्ष डॉ. पी.बी. कुंभार सर यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
याचबरोबर उपाध्यक्षपदी अॅड. राजन दीक्षित, नंदकुमार गोसावी यांची सचिवपदी, तर राष्ट्रीय मुस्लिम ओबीसी चे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांची सल्लागार पदी तर महाराष्ट्र प्रदेश महीला ओबीसी भटके विमुक्त फेडरेशन अध्यक्षपदी माजी नगरसेविका सौ. पुष्पा कनोजिया, तर उपाध्यक्ष पदी सौ. कीरण शिंदे यांची एकमतानी निवड करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसीचे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर डॉ. प्रल्हाद वडगांवकर, ओबीसीचे राष्ट्रीय ओबीसीचे महासंघ, महाराष्ट्र प्रदेशचे जनलर सेक्रेटरी सुभाष मुळे, मुख्य उपाध्यक्ष संदिप लचके मंचावर उपस्थित होते.
यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष पद स्वीकारले नंतर हरिभाऊ राठोड म्हणाले की आपण कोणत्याही संस्था, संघटनेचे पक्षाचे काम करा. मात्र ओबीसीच्या या राष्ट्रीय फेडरेशनच्या शिखर संस्था म्हणून या ठिकाणी एकत्र आले पाहिजे तरच आपल्या ओबीसी चे प्रश्न शासनाकडून व केंद्राकडून सोडवण्यासाठी न्यायिक भूमिका पार पाडता येईल. ओबीसी चे आजही अनेक प्रश्न प्रलंबित सोडवण्यासाठी या फेडरेशन ची स्थापना केली आहे.
यावेळी डाॅ. पी. बी. कुंभार म्हणाले की, घटनेच्या कलम ३४०,३४१, ३४२ प्रमाणे सर्वाना समान न्याय मिळाला पाहिजे. ओबीसी जनगणना, स्वतंत्र आर्थिक बजेट, शैक्षणिक सवलती, ओबीसी आरक्षण असे अनेक प्रश्न प्रलंबित असेन सर्व ओबीसीनी एका छत्राखाली काम करण्यासाठी फेडरेशनची आज स्थापणा केल्याचं सांगितलं.
शब्बीर अन्सारी म्हणाले की कोणत्याही घटकांवर अन्याय होता कामा नये यासाठी मोठी लढाई करावी लागणार असून प्रथम सर्व घटकांची जात वार जनगणना झाली पाहिजे. हा प्रथम अजेंडा घेऊन सर्वजण काम करू या. तसेच ओबीसी आरक्षण वाचवू या, कोणत्याही घटकांवर अन्याय होऊ नये असे विविध गोष्टी वर अनेक जणांनी मते मांडली. यावेळी एकच निर्धार करून लढा उभारत राज्यकर्ते बनू या असा संकल्प सर्वांनी केला. तसेच या फेडरेशन छताखाली सर्वांनी एकत्र काम करणार असल्याचे सर्वांनी जाहीर केले. यावेळी राष्ट्रीय ओबीसीचे महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे समन्वयक दिपक महामुनी, सचिव सुधाकर कुंभार, प्राचार्य डाॅ. राहुलकुमार हिगोले सर, मा. प्राचार्य व्यंकट वांगवड सर, निलेश बोंगाळे, सिद्धेश हिरवे, महादेव मेंघे, सुधीर पाषाणकर, अंकुश शिंदे, मुर्ती राठोड, महेश भाट, हनुमंत गायकवाड, शेखर बामणे, आकाश ढोक, रमेश कुलकर्णी, रणजित माळवदे तसेच समस्त ओ. बी. सी. महासंघ महाराष्ट्र प्रदेश परिवार मधील बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार सर्व समाजातील नियुक्त पदाधिकारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक उपाध्यक्ष ऍड राजन दीक्षित आणि सूत्रसंचालन सत्यशोधक रघुनाथ ढोक तर आभार प्रदर्शन प्रा.सुदाम धाडगे यांनी मांडले. शेवटी राष्ट्रीय गीताने सभेची सांगता केली
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती गंभीर जखमी,एस टी चालकाविरुद्ध फिर्याद अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ शिवारात धुळे रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कुल जवळ एस टी बस व दुचाकी ...
-
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांचा टेकू घेऊन भाजप प्रणित एनडीए सरकार सत्तेत आल...
-
अमळनेर : प्रशासनाच्या सतर्कतेने बालविवाह रोखण्यात आला असून अल्पवयीन मुलीच्या पालकांना पोलिसांनी सक्त ताकीद देऊन सोडले आहे. मुलीला बाल...
-
मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देतांना संघटनेचे राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे पारोळा (प्रतिनिधी) राज्यातील मनरेगाचे ग्राम...
-
गाव पातळीवरील माहितीने महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यात पोलीस पाटलांची मदत- माजी मंत्री अनिल पाटीलमारवड येथे पोलीस पाटील दिनानिमित्त जिल्ह्यातील पोलीस पाटलांची कार्यशाळा संपन्न प्रतिनिधी अमळनेर- पोलीस व महसूल प्रशासनातील महत्वाचा दुवा म्...
-
अमळनेर : तालुक्यातील मुडी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. तिन्ही ट्रॅक्टर अमळनेर तहसील ...
-
जळगाव जिल्ह्याला पुन्हा ५८ हजार ४७९ घरकुल उद्दिष्ट मिळाले. अमळनेर : पंतप्रधान आवास योजनेनंतर्गत तालुक्यासाठी २७ जानेवारीला ५ हजार ५...
-
उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव व उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय दहिवेल यांच्या संयुक्त विद्यमाने भोणगाव ता.साक्री येथे आयोजित रा...
-
धुळे (प्रतिनिधी)- तालुक्यातील नंदाणे येथील लाचखोर सरपंच व माजी सरपंच धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. सरपंच रविंद्र पाटील व माजी सरपंच अतु...
-
विझास्ट हा दृष्टिहीनांना मदत करणारा छोटासा डिव्हाईस आहे. आगपेटीएवढा हा डिव्हाईस छातीवर लावून ठेवता येतो,आणि समोर दिसणाऱ्या वस्तूंचे वर्णन कर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा