Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

कृषी सहाय्यकाचे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन..!



परंडा (राहूल शिंदे) दि.31 तालुक्यातील चिंचपूर(बु) व परिसरात मोठ्या प्रमाणात या वर्षी लिंबू,संत्री,पेरू,चिक्कू,आंबा  सिताफळ या फळ बागेची लागवड मोठ होत आहे.त्यासाठी योग्य व अभ्यासू मार्गदर्शन शेतकऱ्यांना आवश्यक होते. 

शेतकरी वर्गाची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये.योग्य व तंत्रशुद्ध पद्धतीने फळबागेची लागवड व्हावी जेणेकरून शेतकऱ्यांना भविष्यात जास्तीत जास्त फायदा होईल, यासाठी श्री.देवकर साहेब हे कृषी सहाय्यक चिकल तुडवत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फळ बागेची पाहणी करून योग्य व तंत्र शुध्द मार्गदर्शन करत आहेत.

त्याचबरोबरच सोयाबीन, उडीद,मूग,तूर यावर पडलेल्या रोगावर कोणत्या औषधांची फवारणी करणे आवश्यक आहे, याची शेतकऱ्यांना माहिती देत आहेत.शासनाच्या कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवत आहेत.

या अनमोल मार्गदर्शनामुळे शेतकरी समाधानी असून मनापासून आभार मानत आहे. 

खरोखरच कृषी सहाय्यक कसा असावा व त्यांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काय जबाबदारी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच देवकर साहेब हे होय.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध