Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

ऐनपूर येथे मा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गावातील भोई समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन..!



प्रतिनिधी रावेर:तालुक्यातील ऐनपूर येथे मा आमदार चंद्रकांत पाटील हे आले असता ऐनपूर गावातील वाल्मिक नगर येथे भोई समाज्यासाठी त्यांनी सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन केले.

यावेळी त्यांनी येत्या एका वर्षात सामाजिक सभागृह पूर्ण करून देण्याची शाश्वती दिली.
या प्रसंगी बोलतांना त्यांनी भूमिपूजन केलेल्या जागेवर पुढच्या वर्षापर्यंत या जागेवर सभागृह बांधून तयार झालेलं असेल यात माझ्या मनात काही एक शंका नाही.

ऐनपूर गावातील कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील,शेतकऱ्यांना काही अडचणी असतील त्या आपण आमच्या स्थानिक पदाधिकारी यांच्या मार्फत माझ्यापर्यंत हक्काने पोहचवा, मी त्या सर्व अडचणी शंभर टक्के सोडवेल
मी आपल्या कुटुंबातील आहे,  

माझ्या डोक्यात आमदारकीची हवा गेलेली नाहीय, पण खऱ्या अर्थाने तुम्ही जी मदत केली होती त्या मदतीची उतराई म्हणून मी सामान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची अडचण समजून घेऊन त्या सुसूत्र पद्धतीने सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल
या नंतर गावातील पुर्नवसन भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रमध्ये दोन बेड देण्याचे आश्वासन त्यांनी दिले
या संदर्भात सर्व गावकऱ्यांनी सोसिएल डिस्टनसिंग चे नियम पाळत त्यांचे अभिनंदन केले,

या कार्यक्रमास मुक्ताईनगर शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, महेंद्र मोंढाळे, ऐनपूर येथील तंटा मुक्ती अध्यक्ष जगन्नाथ शामु पाटील माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र महाजन, युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे, सुनील महाजन,प्रवीण महाजन, विनोद कपले टेलर्स, सुनील खैरे, सुनील चौहान निलेश जैस्वाल, मिलींद अवसरमल, तुकाराम भोई, रवींद्र भोई, प्रवीण भोई, पांडुरंग भोई, संतोष भोई, व ग्रामपंचायत सरपंच सदस्य व युवा कार्यकर्ते तसेच ऐनपूर ग्रामस्थ उपस्थित होते..
यावेळी सूत्रसंचालन नितीम जैतकर यांनी तर आभार युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांनी मांडले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध