Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

अभिनंदनीय....!महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते महसूल कर्मचाऱ्यांचा जामनेरात सन्मान....!



जामनेर प्रतिनिधी संजय सुर्यवंशी
जामनेर येथील तहसील कार्यालयामध्ये महसूल दिनानिमित्त महसूल विभागात कौतुकास्पद कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प वाहून करण्यात आली. 

सदर कार्यक्रम हा जामनेर तहसील मध्ये झाला असून सन्मानारर्थी मध्ये जळगाव येथील नायब तहसीलदार शितल साळवे, मंडळाधिकारी- जगदिष गुरव, विष्णू पाटील, लिपिक -मधुकर पाटील, रमेश दांडगे तलाठी- प्रशांत पाटील ,रमेश वंजारी अव्वल कारकून -मनोज सपकाळे, रशिद तडवी शिपाई- प्रकाश जगताप व कोतवाल- संतोष कोळी इत्यादींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला त्याप्रसंगी प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार अरुण शेवाळे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध