Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

शेगावात वृक्षारोपण करून अण्णाभाऊ साठे जयंती साजरी..!



शेगाव (शहरप्रतिनिधी उमेश राजगुरे)

येथील रामदेवबाबा नगर मध्ये काँग्रेस अनुसूचित जाती जमाती सेलच्या वतीने १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंती वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली आहे.
       
अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले त्यांनंतर त्यांच्या जीवन चरित्र्यावर प्रकाश टाकून जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव गवई यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर परिसरात वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा निश्चय करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष विजय काटोले, अनु.जा. विभाग शहराध्यक्ष भिकुभाऊ सारवन, युवक काँग्रेस शहराध्यक्ष पवन पचेरवाल,अमर कलोसे, धरम सारवन,आकाश सारवन,जय सारवन, राहुल सारवन, ईश्वर सारवन, गोविंद सारवन, शिव सारवन, सोनू सारवन, धरम पिवाल, नितीन पिवाल, रंजन सारवन,  ज्ञानेश्वर सारवन यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
 
अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतांना मान्यवर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध