Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

५० वारकऱ्यांच्या उपस्थितीत भजनाला परवानगी द्या..!



युवा विश्व वारकरी संप्रदायाची मागणी ■ तहसीलदार यांना निवेदन

शेगाव (शहरप्रतिनिधी उमेश राजगुरे)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन चालू झालेले आहे आणि तेव्हापासून वारकरी संप्रदायचे भजन कीर्तन सर्व बंद झालेले आहे . सरकारला या भयानक परिस्थितीला सहकार्य करण्याकरिता सरकारने जि बंदी घातली वारकऱ्यांनी सुद्धा सहकार्य केले आणि पायदळ वारीची वर्षानुवर्षेची जि परंपरा होती ती कितीतरी पालख्यांची परंपरा खंडित झालेली आहे त्याचेही दुख आहे पण आता आपण लग्नाला किमान ५० लोकांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी संप्रदायाने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
         
देशी दारूचे दुकाने उघडलेले आहेत तिथेही भरपूर गर्दी आहे आणि मॉलमध्ये भरपूर गर्दी दिसत आहे पण अजूनही वारकरी संप्रदायचे भजन कीर्तन करण्याकरिता परवानगी न दिल्यामुळे भाविकांना भजन कीर्तन करता येत नाहीत द्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले असून यावर युवा विश्व वारकरी सेना शेगाव ता.अध्यक्ष 
 अभिषेक म.पवार,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म.गई, सचिव राम म.वाघ, कार्याध्यक्ष विठ्ठल म. जवंजाळ, लासुरा संपर्कप्रमुख ज्ञानदेव म. फोकमारे, संघटक सोपान म.उन्हाळे टाकळी शेगाव तालुका परिसरातील सर्व वारकरी बांधवांच्या सह्या आहे.

तहसीलदार यांना निवेदन देतांना युवा विश्व वारकरी संप्रदायाचे वारकरी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध