Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०
मुगाव येथे युवकांचा रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद..!
परंडा (राहूल शिंदे ) दि.3 तालुक्यातील मुगाव हे खेडेगाव येथे आज ग्रामस्थांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान शिबीर घेण्यात आले. सकाळी 9 वाजता श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन करून शिबिरास प्रारंभ झाला.या रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले, विशेष बाब म्हणजे सौ.राजश्री झाडबुके, सौ.संजीवनी झाडबुके या महिलांनी देखील रक्तदान करून महिला वर्गाचे देखील प्रतिनिधित्व केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते.
त्याला प्रतिसाद देत,संतोष गायकवाड सर व प्राणजीत गवंडी(अध्यक्ष छत्रपती शासन ग्रूप महाराष्ट्र राज्य) यांच्या संकल्पनेतून ग्रामस्थांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत रक्तदान शिबीर घेण्यात आले.भगवंत रक्तपेढी बार्शी यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांनी अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतले गेले आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेण्यात आली होती. दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते. शिवाय, स्वच्छतेची विशेष खबरदारी म्हणून वारंवार सिनेटाईझरचा वापर करण्यात येत होता.ब्लड बँकेच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास सिनेटायझर व एन 95 मास्क वाटप करण्यात आले.सोशल डिश्टनशिंगचे पालन व आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे प्रफुल्ल झाडबुके सर यांनी बोलताना सांगितले.
राज्यात दररोज साधारण पाच ते सात हजार रूग्णांना विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. शिवाय, उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबिर कोरोनामुळे आयोजितच केले गेले नाहीत. त्यामुळे राज्यात अवघ्या काही दिवसांचाच रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. शिवाय, छोट्या स्तरावर रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे आवाहनही केले होते.
सर्व रक्तदाते व ग्रामस्थ सोशल डिश्टनसिंगचे पालन करून उपस्थितीत होते. सोशल डिस्टंसिंग सह अन्य उपाययोनांचेही ग्रामस्थांच्या कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.विशेषबाब म्हणजे रक्तदान शिबिराचे हे 4थे वर्ष होते.
यावेळी सोमनाथ भागडे, प्रमोद पाटील, रणजित भागडे सर, बाबु जाधव, पै.धनाजी पुरी,अॅ.धनंजय झाडबुके, प्रविण भागडे, विनोद भागडे, जेकटेवाडीचे पोलीस पाटील रविंद्र तांबे,विश्वजन आरोग्य सेवा समितीचे परंडा तालुका आरोग्यदूत राहुल शिंदे, डॉ.गणेश गायकवाड, डॉ.दुगम सर,आदित्य गुळमीरे, चेतन शिरगीरे आदिनी रक्तदान करुन आपला सहभाग नोंदवला या रक्तदान शिबिरासाठी भगवंत ब्लड बँक बार्शी चेअरमन शशिकांत जगदाळे, जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे आदिनी सहकार्य केले.
सर्व रक्तदाते व ग्रामस्थ सोशल डिश्टनसिंगचे पालन करून उपस्थितीत होते. सोशल डिस्टंसिंग सह अन्य उपाययोनांचेही ग्रामस्थांच्या कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.विशेषबाब म्हणजे रक्तदान शिबिराचे हे 4थे वर्ष होते.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
मोफत वीज, वाढीव अनुदान आणि वेगवान गृहनिर्माण... प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी! केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शा...
-
शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला नाशिक येथून घेतले ताब्यात अमळनेर : सात महिन्यांपूर्वी निसर्डी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला गर्भवती करण...
-
शिरपुर प्रतिनिधी- शिरपूर तालुका म्हटले म्हणजे सर्वप्रथम सर्वसामान्याच्या डोळ्यासमोर येते ते, शिरपुर नगरचे भाग्यविधाते व विकासपुरुष मा, आमदार...
-
रणाईचे येथे भक्तनिवास सह विविध विकास कामांचे भूमिपूजन अमळनेर-तालुक्यातील रणाईचे येथील श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिरातील महंत बाबांचा मला न...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यासह मध्यप्रदेश व इतर राज्यात बॅग लिफ्टिंग सह ,बँकेतून काढलेले पैसे लंपास...
-
अमळनेर: तालुक्यातील चौबारी येथील २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना १९ रोजी घडली आहे. याबाबत अधिक माह...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर:- तालुक्यातील मुंगसे येथील २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना २५ रोजी सायंकाळी...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथे खोटी माहिती व कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत चारशे बोगस मतदाराची नावे समाविष्ट करण्या...
-
तरूण गर्जन रिपोट अमळनेर प्रतिनिधी :- तालुक्यातील मुंगसे येथील २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना २५ रोज...
-
जळगाव प्रतिनिधी :- शहरातील शाहूनगर भागात एमडी ड्रग्जचा साठा करून विक्री करणाऱ्या एका संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५ लाख ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा