Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

नंदुरबार जिल्ह्यातील कोपर्लि गावातील एका शेतकरी भोई समाज बांधवांच्या मुलीने स्वतःला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन घेतला प्रथम क्रमांक..!



नंदुरबार प्रतिनिधी:नंदुरबार जिल्ह्यातील कोपर्लि नंदुरबार तालुका विधायक समितीद्वारा संचलित आर सी इंदानी कनिष्ठ महाविद्यालय,कोपर्लि येथील बारावीच्या वर्गात शिकणारी तसेच शेती व मच्छिविक्री करणा-या आनंदा विठ्ठल वानखेडे (भोई ) या समाजघटकाची लेक कुमारी दुर्गा आनंदा वानखेडे (भोई) या विद्यार्थिनीने १२वीत महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक मिळविल्याबाबत तिचे महाविद्यालयातून तसेच परिसरातील समाजघटकांकडून हार्दिक हार्दिक स्वागत होत आहे.

कुमारी दुर्गा हिचे वडील शेती व मच्छीविक्री करुन घराला हातभार लावतात आणि मुलीसुद्धा आपल्या वडिलांच्या घेत असलेल्या कार्याला हातभार लावत आपल्या स्थानावर योग्य कार्य करत आहेत.

कुमारी दुर्गा हिने आर सी इंदानि कनिष्ठ महाविद्यालयात ७३.६९% गुणांनी प्रथम क्रमांकावर आपले स्थान महाविद्यालयातुन पुढे केले असुन तिने आपल्या परिसरात भोई समाजाचा मान मोठा केला आहे. त्याततच परिसरातील सामाजिकपातळीवर आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

कुमारी दुर्गा आनंदा वानखेडे (भोई) हिचे हार्दिक अभिनंदन महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एन.पाटीलसर यांनी केले तसेच यावेळी वाय.एस.पाटीलसर,परदेशी सर,रघुवंशी सर,वडावी सर,आर.डी. पाटीलसर,सोनार सर,एस.पी.पटेल,पी. एस.पाटील,राजपूत सर,वसावे सर,पंकज पाटीलसर तसेच पालकवर्ग हजर होता.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध