Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपच्यावतीने दूध दर वाढी संदर्भात अहिंसक आंदोलने..!



उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.1 संपूर्ण देशावर कोरोना महामारीचे संकट आहे.महाराष्ट्रात तर परिस्थिती खूप भयंकर झाली आहे. या महामारी च्या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक उद्योग-व्यवसाय-धंदे तसेच शेतकरी दुग्ध व्यवसाइक बांधाव संकटात आहेत. दुग्धजन्य पदार्थांचे विक्रीत घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावांमध्ये दूध विक्री करावी लागत आहे. त्याचप्रमाणे पशुखाद्याचे व चाऱ्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असून उत्पादकांना उत्पादनाचा खर्च इतका ही पैसा कमी भावामुळे मिळत नसून सदर व्यवसाय तोट्यात जात आहे.

शासनाने दुधासाठी प्रतिलिटर 10 रुपये अनुदान व पावडर साठी 50 रुपये प्रति किलो अनुदान तसेच दूध खरेदीचा दर प्रतिलिटर 30 रुपये द्यावा आदी मागण्यांसाठी जिल्हाभर आज भाजपच्या वतीने आंदोलने करण्यात आली.

उस्मानाबाद येथे आ.राणा जगजितसिंह पाटील व नितीन काळे यांनी दही घुसळून निघालेले लोणी प्रतिकात्मक श्रीकृष्णाला  खाऊ घातले व या श्रीकृष्णाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुबुद्धी द्यावी,व शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. महाभारतात उद्धव हे श्रीकृष्णाचे मित्र तत्वज्ञ होते, श्रीकृष्णाने उद्धवास जनतेच्या प्रति त्याग व परिश्रमाचे धडे दिले, त्याग व परिश्रमाचा अभाव लोकप्रतिनिधीच्या ज्ञानाला संकुचित ठेवतो, श्रीकृष्णाने जनहितासाठी उद्धवाना मौलिक मार्गदर्शन केले होते तसेच मार्गदर्शन भगवान श्रीकृष्णाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करावे व त्यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

परंडा येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत रस्तारोको आंदोलन करण्यात आले.तर तालुक्यातील आनाळा येथील शिवाजी चौक येथे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे जि.प.सदस्य रमेश पवार,अॅड गणेश खरसडे,निशीकांत क्षिरसागर, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अनिल पाटील,पंचायत समिती सदस्य सतिष देवकर, सरपंच कांतीलाल पाटील, मा.सरपंच गिरीधर कोलते, जोतीराम क्षिरसागर, पोपट सुरवसे, आर.चांगदेव चव्हाण, आर.पी.आय. चे दादा सरवदे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत  होते.

तुळजापूर येथे तालुक्याचे  आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मातेच्या महाद्वारा समोर जागरण गोंधळ आंदोलन घालण्यात आले.यावेळी अनिल काळे,संतोष बोबडे, विशाल रोचकरी, आनंद कंदले,बाळासाहेब शिंदे,अभिजित कदम,सुहास साळुंखे आदी उपस्थितीत होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध