Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

हर्षल गवळी आणि टीम चा मैत्रीदिनाच्या निमित्ताने नवीन प्रयोग..!



आयुष्य, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअर्स आणि वंदे मातरम सारख्या प्रोजेक्ट्स नंतर टीम इन्फ्लुएन्स मैत्रीदिनाच्या निमित्ताने घेऊन आलीए एक नवीन हिंदी गाणे 'याराना - अधूरी बातों को पूरा करते हैं'. या गाण्याचे वितरण सुप्रसिध्द कंपनी 'टिप्स म्युझिक' च्या माध्यमातून होत आहे आणि प्रदर्शित झाल्यापासूनच गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळतोय.

गाण्याची पटकथा आणि दिग्दर्शन हर्षल गवळीने तर लेखन आणि रचना स्वप्नील ढवळे यांनी केली आहे.

गाण्याला आवाज दिलाय बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक मंदार देशपांडे यांनी, ज्यांनी आजवर अनेक हिंदी व मराठी अल्बम्स गायले आहेत.

गाण्याचे प्रदर्शन २ ऑगस्ट ला मैत्री दिनानिमित्ताने करण्यात आले आणि ते टिप्स म्युझिकच्या व्हॉल्युम या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. गाणं ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या मित्रांची आणि जुन्या दिवसांची नक्की आठवण येईल अशी खात्री हर्षल ने व्यक्त केली. विशेष म्हणजे हा पूर्ण प्रयोग आम्ही लॉकडाऊन च्या काळात केला आणि नवनवीन पद्धत वापरून हे गाणे पूर्ण केले; आणि तेही सोशल डिस्टंसिन्ग आणि कोरोना बद्दलचे सर्व नियम आणि अटींच्या मर्यादा पाळून. तुम्हालाही हा प्रयोग बघायला नक्की आवडेल.

पटकथा आणि दिग्दर्शन - हर्षल गवळी

गायक - मंदार देशपांडे

लेखक व गीतकार - स्वप्निल ढवळे

संकलन - मंथन तन्नू

छायांकन - गिरीश साळी

अभिनय - हर्षल गवळी, पुजा पाटील, अनिल सुपे, रोहित पाटील, गिरीश साळी.

प्रमोशन टीम - स्वप्निल मोरे, रवि अडलिंगे, स्वप्निल गवळी.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध