Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आ.गिरीश महाजन यांचा रस्ता रोको आंदोलन...!



जामनेर प्रतिनिधी संजय सूर्यवंशी
गेल्या साडेतीन महिन्यांपासून संपूर्ण जगाला कोरोना महामारी ने ग्रासले असून या महामारी च्या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक उद्योग-व्यवसाय तसेच शेतकरी दुग्ध व्यवसाइक बांधाव संकटात आहे. दुग्धजन्य पदार्थांचे विक्रीत घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावांमध्ये दूध विक्री करावी लागत आहे.त्याचप्रमाणे पशुखाद्याचे व चाऱ्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असून उत्पादकांना उत्पादनाचा खर्च इतका ही पैसा कमी भावामुळे मिळत नसून सदर व्यवसाय तोट्यात जात आहे.

शासनाने दुधासाठी प्रतिलिटर 10 रुपये अनुदान व पावडर साठी 50 रुपये प्रति किलो अनुदान तसेच दूध खरेदीचा दर प्रतिलिटर 30 रुपये द्यावा.

तसेच तूर हरभरा कापूस सुद्धा शेतकऱ्यांचे पडून आहे.कर्जमाफी कागदावरच असून पीक कर्ज मागणारे शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये वारंवार अपमान होत असून बळीराजा कमालीचे हवालदिल झालेला आहे.आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मालाची शासनाने थांबवलेली शासकीय खरेदी त्वरित सुरू करावी व मोजलेला मालाचा मोबदला शेतकर्‍यांना त्वरित अदा करण्यात यावा असेही या वेळी आ. गिरीश महाजन म्हणाले तसेच रासायनिक खतांची टंचाई असून शेतकऱ्यांना खतासाठी वणवण फिरावे लागत आहे. शासनाच्या धोरणानुसार त्यांना बांधावर खत उपलब्ध करून द्यावे व कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी चा शासनाच्या धोरणानुसार लाभ मिळवून द्यावा व छुप्या पद्धतीने केलेली वीज दरवाढ त्वरित मागे घ्यावी. 

असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी आ. गिरीश महाजन गोविंद शेठ अग्रवाल चंद्रकांत बाविस्कर बाबुराव घोंगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . आणि  तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले. सदर आंदोलनासाठी तुकाराम निकम दिलीप खोडपे सर ,जितेंद्र पाटील बाबुराव घोंगडे, नवलसिंग पाटील महेंद्र बाविस्कर, प्रशांत भोंडे अमर पाटील, अतिश झाल्टे, रवींद्र झाल्टे ,आनंदा लाव्हारे चंद्रशेखर काळे ,दीपक तायडे संतोष बारी ,बाबुराव हिवराळे, दत्तू काळे, प्रवीण नरवाडे ,प्रमोद वाघ, रमण चौधरी आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध