Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
शासनाने विशेष परवानगी दिली असून येत्या 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत शहरातील..! मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने सुरु करण्यात येतील..!
शासनाने विशेष परवानगी दिली असून येत्या 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत शहरातील..! मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने सुरु करण्यात येतील..!
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यातील दुकानदारांची दुकाने सुरु करण्याची सातत्याने होत असलेली मागणी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आली होती. यास शासनाने विशेष परवानगी दिली असून येत्या 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत शहरातील मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने सुरु करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महापौर भारतीताई सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मनपा आयुक्त सतीष कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन एस चव्हाण उपस्थित होते.
श्री.पाटील पुढे म्हणाले की, दिनांक 5 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या दुकांनाबाबत सुक्ष्म नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी संघटनेची बैठक आयोजित करुन धोरण, नियमावली निश्चित करावी, गर्दीचा उद्रेक होणार नाही याची दक्षता दुकानदारानी तसेच ग्राहकांनी घ्यावी, राज्यशासनाचे यापूर्वीचे सर्व निर्बंध लागू राहतील, मास्क वापरणे, सॅनिटायाझर, शारीरीक अंतर इत्यादी बाबींचे स्वयंशिस्तीने पालन व्हावे. कोरोनाचा संसर्ग ज्या मार्केटमध्ये आढळेल तेथील दुकाने नियमाप्रमाणे सील करण्यात येतील तसेच मॉल्स मधील दुकाने सुरू केली तरी सिनेमागृह व रेस्टॉरंट मात्र बंदच राहतील असे त्यांनी यावेळी सांगितले.
11 हजार 750 सेवानिवृत्तांना थकीत महागाई भत्ता अदा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील 11 हजार 750 सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दोन वर्षापासून थकीत असलेला महागाई भत्ता रक्कम रुपये 61 कोटी 74 लाख रुपये अदा करण्यात आल्याची माहिती श्री.पाटील यांनी यावेळी दिली. मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी पोर्टल बंद झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी मका खरेदी करण्यासाठी नोंदणी केली आहे. अशा शेतकऱ्यांचा मका शासनाने खरेदी करावा अथवा त्यांना अनुदान द्यावे यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करु, असेही एका प्रश्नाच्या उतरात श्री.पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरा होण्याचा दर आता 70% पर्यंत पोहोचला आहे. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. असे असले तरी नागरिकांनी स्वयंशिस्तीने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.
जळगाव शहर महानगर पालिकेचे आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार असल्याचे सांगून यात सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधींशी विचार विनिमय करुन धोरण ठरविण्यात येईल. शासनाच्या नियमांची त्यांना माहिती देऊन नंतर दुकाने सुरू करण्यात येतील.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
मोफत वीज, वाढीव अनुदान आणि वेगवान गृहनिर्माण... प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी! केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शा...
-
शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला नाशिक येथून घेतले ताब्यात अमळनेर : सात महिन्यांपूर्वी निसर्डी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला गर्भवती करण...
-
अमळनेर: तालुक्यातील चौबारी येथील २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना १९ रोजी घडली आहे. याबाबत अधिक माह...
-
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाटा येथे सप्टेबर २०२४ शेवटच्या आठवड्यामध्ये अल्पवयीन १६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तीच्यावर ३-४ नराधमांनी केलेल...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथे खोटी माहिती व कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत चारशे बोगस मतदाराची नावे समाविष्ट करण्या...
-
अमळनेर : तालुक्यातील बोहरा रस्त्यावर १६ रोजी महसूल पथकाने अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून मुद्देमालासह तहसील कार्य...
-
जळगाव प्रतिनिधी :- शहरातील शाहूनगर भागात एमडी ड्रग्जचा साठा करून विक्री करणाऱ्या एका संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५ लाख ...
-
बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घट...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
संपादकीय भारताच्या संविधानाने आम्हाला मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत. संविधान कायद्यापुढे समानता ही आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीस भारताच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा