Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २९ जुलै, २०२०

दहावीच्या परीक्षेत यंदाही जामनेरला मारली मुलींनी बाजी....!



जामनेर (प्रतिनिधी) संजय सुर्यवंशी:
दहावीच्या परीक्षेत  यंदाही मुलांच्या तुलनेत अधीकांश मुलींनीच बाजी मारल्याचे दिसुन येत आहे. इदिराबाई ललवाणी स्कुल जामनेरच्या ललवाणी हायस्कूलचा तालुक्यात सर्वात जास्त (९७.७९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

शाळेची विद्यार्थीनी गायत्री पाटील ९६ टक्के गुण मिळवून प्रथम  तर दुसऱ्या क्रमांकाने आचल मनोज महाजन(९५.४० टक्के) गुण मिळाले .तर तिसऱ्या क्रमांकाने सेजल राजेश पाटील ही विद्यार्थिनीं ( ९४.२०) टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली . शाळेतील एकुण ३६२ पैकी ३५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.न्यु इंग्लिश स्कुलचा- ९६:४४ टक्के इतका लागला असुन  प्रथम कल्याणी रूमसींग परदेशी (९८ टक्के) गुण मिळवुन प्रथम तर प्रसाद सत्यवान पाटील (९६:८० टक्के) द्वितीय आणी यश समाधान किरोते (९६:६० टक्के) हा तीसरा आला.याच शाळेतील पाच विद्यार्थ्यानी गणीत विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले.शाळेच्या ५९ विद्यार्थ्याना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे.

                      
एकलव्य माध्यमीक स्कूलचा एकुण निकाल ९५:१८ टक्के इतका लागला असुन प्रदीप सुनील पाटील व दिपाली विजय गायकवाड हे दोघ (९१:४०) टक्के मिळवुन प्रथम,जितेंद्र सुकदेव गवळे (८७:२० टक्के) द्वितीय तर ओम मोहनसींग खोनगरे (८६:६० टक्के) तृतीय. अंजुमन उर्दु हायस्कुल शेख मुजम्मील शेख नईम (९३ टक्के) प्रथम,तंजीला वसीम काझी (९२ टक्के) द्वितीय तर अरशीयानाज अमीनोद्दीन शेख (९१:२० टक्के) तृतीय. लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल ची-सायली पाटील (९३:२० टक्के) गुण मिळवुन पहीली, प्रथम पाटील (९२:६० टक्के) दुसरा तर  साक्षी दुबे (८८:२० टक्के) तीसरी आली. 
 
कन्या माध्यमीक स्कुल शहरातील कन्या माध्यमीक शाळेचा एकुण निकाल ९३:३३ टक्के लागला असुन पल्लवी रवींद्र तेली (८०:२० टक्के) पहीली,दिव्या विकास मिस्तरी (८० टक्के) दुसरी तर अर्पिता शांताराम महाजन (७८:८० टक्के) तीसरी आली.  
                                          
ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयातील-रोहीत कैलास पाटील (७६:६० टक्के) प्रथम,दिपक विश्वनाथ शिंदे (७५ टक्के) द्वितीय तर गायत्री नारायण चव्हाण (७३:२० टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सर्वांचे तरून गर्जना परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन...




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध