Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २५ जुलै, २०२०

युरिया खतासंदर्भात सरकारचे दुर्लक्ष...! शेतकी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर यांची मागणी..!



जामनेर:प्रतिनिधी संजय सुर्यवंशी
सध्या तालुकाभरात चांगला पाऊस होत असल्याने पिकांना खतांची नितांत अशी आवश्यकता आहे,त्यातच अनेक व्यापारी वर्गाकडुन खताची, मुख्यतः युरीयाची कृत्रीम टंचाई भासविली जात असल्यामुळे अशा टंचाई निर्माण करू पहाणाऱ्यांची साखळी प्रशासनाने शोधुन काढण्याची गरज निर्माण झाल्याची मागणी शेतकीसंघाचे सभापती तथा भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर यांनी केली.शुक्रवार सायंकाळी शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात खत समस्येवर त्यांनी  पत्रकार परीषद बोलाविली होती यावेळी उपसभापती बाबुराव गवळी उपस्थित होते .त्यामधे त्यांनी वरील प्रमाणे मागणी केली.शेतकी संघाच्या वतीने स्वतःच्या सभासदांसह अन्य शेतकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही खतांची विक्री सुरू आहे,मात्र पुरवठाच कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना पाहीजे तेवढ्या खतांच्या थैल्या आम्ही पुरवु शकत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ झाल्याचे आज (२४) सकाळी पहायला मिळाल्याची कबुलीही सभापती बावीस्कर यांनी दिली.शेतकी संघाला आठवड्याला ४०० टनाची तर दररोज सुमारे ५० टनाची गरज आहे,तेवढ्याप्रमाणात खत संस्थेला उपलब्ध होऊ शकत नाही,आम्ही २६६ रूपयांप्रमाणे प्रती थैली विक्री करतो तर बाहेरच्या व्यापारी हिच थैली ३५० पर्यंत शेकऱ्यांच्या माथी मारतात,शिवाय युरीया घ्यायला आमच्याकडे पाठवीतात आणी स्वतः मात्र ईतर खते त्यांचेचकडुन घेणे भाग पाडतात,त्यामुळे आमच्या संस्थेकडील अन्य खते पडुन राहतात,पर्यायाने संस्थेस आर्थीक नुकसान सहन करावे लागते.
राज्य शासनाची"बांधवर खते" योजना कागदावरच
राज्यशासनाने पावसाळ्या आधीच जाहीर केलेली शेतकऱ्यांच्या बांधावर बि-बियाणे आणी खते ही योजना फक्त कागदावरच राहीली असुन,शेतकऱ्यांना आज खतांसाठी वण-वण भटकावे लागत असल्याचा ठपका श्री बावीस्कर यांनी पत्रकार परीषदेत ठेवला. यासाठी राज्यशासनाने खतांच्या टंचाईकडे प्रामाणीक हेतुने पाहुन स्थानीक प्रशासनाद्वारे संबंधीत साखळी शोधुन काढावी आणी तमाम शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असेही प्रतीपादन चंद्रकांत बावीस्कर यांनी पत्रकार परीषदेत केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध