Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
पालखीचे भोई म्हणजे च फक्त इतरांचे ओझेवाहक असा तरी वर्तमानात उल्लेख होता कामा नये...!
पालखीचे भोई म्हणजे च फक्त इतरांचे ओझेवाहक असा तरी वर्तमानात उल्लेख होता कामा नये...!
संपादकीय
भारताच्या संविधानाने आम्हाला मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत. संविधान कायद्यापुढे समानता ही आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण हे कोणीही नाकारु शकत नाही.
धर्म,वंश,जात,लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून कोणासही भेदभाव करण्यास मनाई आहे अर्थात कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही कारणावरून त्यांच्यामध्ये भेदभाव करता येणार नाही किंवा भेदभाव करण्याचा प्रयत्न हा होता कामा नये असे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यात राजभोई, कहारभोई, झिंगाभोई,परदेशीभोई, कहारगोडीया, किरात, मछुआ,मांझी,जतिआ,केवट,ढीवर, धीवर,धीमर,पालेवार,मच्छिंद्र, नावाडीभोई, मल्हार,मल्हाव,मल्लाव,बोई, नावाडी,नावाडीतारु,खाडीभोई,गाढवभोई, खारेभोई, ढेवरा,भनारा-भनारी-भनारे, निषाद,मल्ला,मल्हारभोई, नाविकभोई, ओडेवार,ओडेलु,बेस्तार-बेस्ता या भटक्याजमाती आपआपल्या ठिकाणी राहून समाजसेवेच कार्य भुतकाळात करत होत्या किंबहुना महाराष्ट्र राज्यातील ह्या जमाती आपली सामाजिक जिम्मेदारी पार पाहतांना दिसत होत्या आणि आजही त्या वर्तमान काळात पार पाडत आहेत.
महाराष्ट्र राज्यात भोई, कहार व तत्समजमाती ह्या इतिहासाच्या काळानुसार अस्तित्वात होत्या आणि आजही त्या आपला इतिहास समोर ठेऊनच चालतांना दिसत आहेत आणि त्यांचा हा इतिहास कोणीही समाप्त करु शकणार नाही कारण पुर्वीचे राजे, वतनदार, देशमुख, कुलकर्णी, पटवारी यांच्यासेवे सोबत बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदारातील त्यांची ही महत्त्वाची भूमिका होती.
त्यांचा इमानेइतबारे व्यवहारच त्यांची लायकी पुढे सादर करत होती. काही संस्थानात त्यांना ताम्रपट, काही जमिनीच्या स्वरुपात इमानेही मिळालेली आहेत. पालखी उचलणारे भोई तसेच पालखी-मेणा उचलणारे कहार म्हणूनही त्यांचा उल्लेख पालखीमेणाचे वाहक होते काही ठिकाणी तर केवट नावाडी हा पैलतीरी नेण्याचे कार्य करत होते.
काही ठिकाणी तर मल्ल म्हणजेच शक्तिमान म्हणून मल्लाह-मल्लाव गणतीत होते. मच्छिमारी व डांगरवाडी हे त्यांचे पुरकव्यवसाय नदी, तलावांच्या संपर्कात राहत असल्याने करत होते. आजही काही ठिकाणच्या मंदिरात, देवस्थानात भोई, कहार तसेच इतर जमातींना पालखी-मेना हे वहन करण्याचा मान मिळत असतो परंतु एक दुःखाची बाब म्हणून समोर येताना दिसते आहे ती ही की,त्यांची कृती ही हमाल अर्थात ओझे वाहण्याची होताना दिसते आहे किंवा सातत्याने तसा त्याचा उल्लेख हा काही राजकीयपक्ष हे राजकीयपटलावरुन करतांना दिसत आहेत किंबहुना सदरची कृती ही सामाजिक तसेच राजकीयपटलावरून कोणी करतांना दिसत असेल तर ती संपुर्ण चुकीची बाब आहे.
आणि ती बाब सदर समाजाच्या सामाजिक स्वाभिमानाला मारकच आहे आणि अशा बाबींचा तरी कदापि हा समाज स्वीकार करणार नाही, अशा बाबींचा सामाजिकपातळीवरुन निषेध नोंदवुन तो वेळेवर उत्तर देईलच असे वाटते.
पूर्वापार काळापासून हा समाज पालखी वाहत होता त्यात छञपती शिवाजी महाराजांच्या विश्वासातील ही माणसं.... पालखी वाहनं ही त्यांची कमजोरी नव्हती तर तो त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग होता, स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांचे योगदान होते, स्वराज्याप्रति त्यांची निष्ठा होती आणि बलिदान स्वीकारण्यास तयारी होती किंबहुना त्यांनी स्वराजनिर्मिती मध्ये आपले बलिदान दिले आहे; परंतु त्यावर सातत्याने कुठाराआघातच होत आहे.
किंबहुना ती भुतकाळातील कार्याची अवहेलनाच म्हणावी लागेल आणि ती होत असतेल तर ती योग्य तरी नाही.आजपर्यंत तरी दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्यात धन्यता त्यांनी मानली परंतु आता तेही स्वतः पालखीत बसण्याचे धाडस करत आहेत आणि सातत्याने त्यांना जो कमी लेखण्याचा प्रयास प्रयत्न होत अाहे तो योग्य नाही याची आठवण तरी त्या संपूर्ण जमाती एकत्र येऊन कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कोणत्याही विचार प्रवाहाला देण्याचा निश्चित प्रयत्न करतील...!
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाटा येथे सप्टेबर २०२४ शेवटच्या आठवड्यामध्ये अल्पवयीन १६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तीच्यावर ३-४ नराधमांनी केलेल...
-
अमळनेर: तालुक्यातील चौबारी येथील २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना १९ रोजी घडली आहे. याबाबत अधिक माह...
-
अमळनेर : तालुक्यातील बोहरा रस्त्यावर १६ रोजी महसूल पथकाने अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून मुद्देमालासह तहसील कार्य...
-
शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला नाशिक येथून घेतले ताब्यात अमळनेर : सात महिन्यांपूर्वी निसर्डी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला गर्भवती करण...
-
बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घट...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
रस्ता मंजूर नाही;पाटी का लावली? ग्रामस्थांचा सवाल नंदूरबार प्रतिनिधी: सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते हेंगलापाणी ५ किलोमीट...
-
शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री खंडेराव महाराजांचा यात्रौत्सव उद्या दि.१२ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. महाआरतीच...
-
संपादकीय भारताच्या संविधानाने आम्हाला मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत. संविधान कायद्यापुढे समानता ही आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीस भारताच्या...
-
गलंगी नाक्यावर वाहनांची तपासणी थाळनेर : सध्या देशासह राज्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूने थैमान घातल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या द...
अगदी बरोबर आहे सर
उत्तर द्याहटवाभोई आणि तत्सम भोईजाती ज्यांना मेणा पालख्या उचलणारे म्हणून हिणवून हमाल या अर्थाने कुणी गैरसमजाने त्यांच्याकडे पाहू नये,ही भूमिका सर्वच समाजबांधवांची आहे!भोई ही एक लढाऊ वृत्तीला बाणेदारपणे जपणारी जात असल्याने मोठ्या सुरक्षेच्या विश्वासातून त्यांना ही जबाबदारी धर्म अथवा राजसत्ता चालवणारे सोपवत असत.प्रामाणिक आणि इमानेइतबारे पिढी दर पिढी या जातीने ही विश्वसनीय ओळख इतिहास काळापासून निर्माण केलेली आहे. जिचा सार्थ अभिमान वाटतो!
उत्तर द्याहटवासंपादक महाशयांनी भोई समाजाची ही गौरवास्पद अस्मिता जपण्यासाठी लेखातून पुन्हा उजाळा दिला त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शतवार आभार!