Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ जुलै, २०२०
यावलमध्ये बिना परवानगी भरला बकरी बाजार ; प्रांताधिकारी थोरबोले यांचे कारवाईचे आदेश
यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील कृषी उपन्न बाजार समिती उपबाजार पाडळसे,शिवार भोरटेक मध्ये सकाळी ८:०० वाजेला बकरा बाजार भरविला. याबाबत प्रांताधिकारी थोरबोले यांना विचारणा केली असता प्रशासनाकडून बाजाराला कुठलीही परवानगी देण्यात आलेली नसून बिना परवानगी बकरा बाजार भरविण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. घटनास्थळी पोलीस कर्मचारी पाठवून बाजाराला ताबडतोब बंद करण्याचे आदेश दिले.
सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.जिल्ह्यात सर्व ठिकाणी बकरा बाजार बंद ठेवण्यात आले आहे. यानंतरही जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून दिनांक २२ जुलै रोजी यावल येथील कृषी उपन्न बाजार समिती उपबाजार पाडळसातर्फे बकरा बाजार भरविण्यात आला.
मुंबई कोकण, छत्तीसगड, मध्यप्रदेश, विदर्भ तसेच जिल्ह्यातील व्यापारी १०० ते २०० वाहने घेऊन बकारा विकत घेण्यासाठी आलेले होते. दिनांक १ ऑगेस्ट रोजी बकरा ईद असल्याने कुर्बानीसाठी बकरा चढविण्याची प्रथा आहे.दरवर्षी फैजपूर येथील कृषी उपन्न बाजार समितीमध्ये बकरा बाजार भरविण्यात येतो यासाठी फैजपूर शहर देशात यासाठी प्रसिद्ध आहे.
देशाच्या कानेकोपऱ्यातून खरेदीसाठी लोक येतात. कृषी उपन्न बाजार समितीच्या एक ते दीड किलोमीटरचा परिसर वाहन व बकऱ्यांनी तसेच लोकांनी भरल्याने जत्रेचे स्वरूप दिसते.
पण यावर्षी कोरोनामुळे फैजपूर बाजाराला परवानगी न दिल्याने पाडळसा येथे बाजार भरविण्यात आला. आलेल्यासाठी गेटवर सॅनिटायझरची कुठेही व्यवस्था नव्हती. बिना मास्क विक्रेते व खरीददार बिनधास्तपणे फिरत होते.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
मोफत वीज, वाढीव अनुदान आणि वेगवान गृहनिर्माण... प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी! केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शा...
-
शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला नाशिक येथून घेतले ताब्यात अमळनेर : सात महिन्यांपूर्वी निसर्डी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला गर्भवती करण...
-
अमळनेर: तालुक्यातील चौबारी येथील २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना १९ रोजी घडली आहे. याबाबत अधिक माह...
-
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाटा येथे सप्टेबर २०२४ शेवटच्या आठवड्यामध्ये अल्पवयीन १६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तीच्यावर ३-४ नराधमांनी केलेल...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथे खोटी माहिती व कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत चारशे बोगस मतदाराची नावे समाविष्ट करण्या...
-
अमळनेर : तालुक्यातील बोहरा रस्त्यावर १६ रोजी महसूल पथकाने अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून मुद्देमालासह तहसील कार्य...
-
जळगाव प्रतिनिधी :- शहरातील शाहूनगर भागात एमडी ड्रग्जचा साठा करून विक्री करणाऱ्या एका संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५ लाख ...
-
बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घट...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
संपादकीय भारताच्या संविधानाने आम्हाला मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत. संविधान कायद्यापुढे समानता ही आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीस भारताच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा