Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २५ जुलै, २०२०

शिक्षण संस्थेची परस्पर जमीन विक्री प्रकरणी गुन्हा..! माजी अध्यक्ष,सचिवासह तीघांवर फसवणुकीचाआरोप..!


जामनेर(प्रतिनिधी) संजय सुर्यवंशी 
जामनेर तालुका शिक्षण संस्थेच्या मालकीची जमीन बाजार भावाप्रमाणे सुमारे ५० लाखाची असतांना कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याकडुन परवानगी न घेता मनमानी पणाने फक्त ३ लाख रूपयांना विक्री केल्याप्रकरणी माजी अध्यक्ष,माजी सचिव,खरेदीदार अशा तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजीअध्यक्ष आबाजी नाना पाटील,माजी सचिव नारायण देवचंद महाजन (चौधरी) आणी खरेदीदार माधव अनंतराव देशपांडे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.तक्रारदार सुनील उर्फ माधव विठ्ठल चव्हाण यांच्या तक्रारीनुसार दिनांक ८ जानेवारी २००१ रोजी वरील दोघा संशयीत आरोपींनी आपल्याला कोणताही अधिकृत अधिकार नसतांना संस्थेची कोणतीही बैठक वा ठराव न घेता कटकारस्थान करून
अप्रामाणीकपणे संगणमताने संस्थेची गटक्रमांक ५६४ क्षेत्र २ हेक्टर ५४ आर जमीन  परस्पर  विकुन टाकली आणी संस्थेची फसवणुक केली आदी लेखी तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

त्यामुळे पोलीसात  गुरनं १९९/२०२० भादवी कलम 

४२०,४०६,४०८,४६५,४६७,४६८,४७१ ३४ आदी कलमांद्वारा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीसनिरीक्षक प्रताप ईंगळे यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध