Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २७ जुलै, २०२०

मच्छिमार बांधवांना शासनाने आर्थिक मदत करावी..!भारतीय मच्छीमार संघ जळगाव शाखा जामनेर यांच्यावतीने मागणी...!



जामनेर प्रतिनिधी संजय सूर्यवंशी
भारतीय मच्छीमार संघ जळगाव शाखा जामनेर यांच्या वतीने जामनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की गेल्या चार ते पाच महिन्यापासून कोरोना या महामारीचे देशावर संकट आलेले आहे. 

त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सर्व मच्छीमार बांधवांचा मासेमारी हा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे सर्व बांधवांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली असून चक्रीवादळ या अस्मानी संकटामुळे देखील मच्छीमार हा संकटात सापडलेला आहे.सर्व बांधवांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असल्याकारणाने मच्छीमार कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावरच अवलंबून आहे . 

या सर्व परिस्थितीमुळे मासेमारी करणारे बांधव व त्यांचे कुटुंब उध्वस्त झालेले आहे. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना माहे प्रत्येकी कुटुंबास 15 हजार रुपये प्रमाणे शासनाने आर्थिक मदत करावी असे संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे त्याप्रसंगी आत्माराम शिवदे,छोटू भोई संजय भोई, रवींद्र भोई ,लालचंद भोई जगन भोई, श्रीराम भोई, नाना भोई आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध