Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २७ जुलै, २०२०

माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या हस्ते जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सीजन प्रणालीचा शुभारंभ...!



जामनेर:प्रतिनिधी:जामनेर तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांना ऑक्सिजन साठी जळगांव नेण्याचीआता गरज भासणार नाही अशी महत्वपुर्ण माहिती माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकारांना दिली.शहरातील उपजिल्हा रूग्णालयामधे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर ५० पाईपलाईनद्वारा ऑक्सीजन बेड प्रणालीच्या कक्षाचा शुभारंभ आ.महाजनांच्या हस्ते करण्यात आला. 

याउपक्रमासाठी सुप्रीम पाईप कंपनीने आपल्या सि.एस.आर. मधुनही मोलाची मदत करण्यात आली.  उपजिल्हा रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विवीध सोयी-सुवीधांची माहिती देऊन शहरात लवकरच १०० बेडचे नॉनकोवीड सेंटर जिएम हॉस्पिटलच्या माध्यमातुनही
तालुकावासीयांना येत्या चार-पाच दिवसात सेवा मिळणार असल्याचेही आमदार गिरीश महाजनांकडुन सांगण्यात आले.  

याप्रसंगी प्रान्ताधिकारी दिपमाला चौरे,तहसीलदार अरूण शेवाळे,नोडल अधिकारी डॉ विनय सोनवणे,डॉ आर के पाटील,डॉ हर्षल चांदा,डॉ प्रशांत महाजन,डॉ जयश्री पाटील, तालुका वैद्यकीय अधीकारी डॉ राजेश सोनवणे, पालीकेचे मुख्याधीकारी राहुल पाटील,पोलीसनिरीक्षक प्रताप इंगळे,आरोग्य सेवक अरवींद देशमुख आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध